सांगली: शिवसेना - भाजप पवित्र युतीला डाग लावण्याचे काम ज्यांनी केले त्यांना सडेतोड उत्तर देऊन कसलीही पर्वा न करता काँग्रेसच्या दावणीला बांधलेली शिवसेना आपण सोडवली, असा घणाघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर केला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, की काँग्रेस आणि इंडिया आघाडीचा जन्म कट, कमिशन आणि करप्शनसाठी झाला. त्यांच्याकडे अजेंडा नाही, नियत नाही आणि नेतासुद्धा नाही. मोदीजींवर बोलण्याचा नैतिक अधिकार त्यांना नाही. संविधान बदलणार असा खोटा प्रचार आणि संभ्रम पसरवण्याचे काम विरोधांकडून केले जात आहे, कारण त्यांना पराभव दिसतोय, असे ते म्हणाले.