सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

मूल्य संस्कारातूनच शिवरायांसारखी तेजस्वी पिढी पुन्हा निर्माण होईल - परमपूज्य गुरुमाऊली

सुदर्शन न्युज चॅनेलचे संपादक व प्रख्यात पत्रकार धर्मयोद्धा श्री. सुरेश चव्हाणके यांनी यावेळी उपस्थित राहून घणाघाती भाषण केले.

Sudarshan MH
  • May 3 2025 9:37AM
नाशिक: आपण सारे एका ध्येयाने प्रेरित होऊन संघटित झालो तर मूल्य संस्काराच्या माध्यमातून छत्रपती शिवरायांसारखी तेजस्वी , पराक्रमीआणि शूरवीर पिढी पुन्हा निर्माण होईल असा विश्वास अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवामार्गाचे प्रमुख परमपूज्य गुरुमाऊली श्री. आण्णासाहेब मोरे यांनी व्यक्त केला तेव्हा उपस्थित हजारो सेवेकऱ्यांनी टाळ्यांचा जोरदार कडकडाट आणि स्वामीनामाच्या जयघोष करून वातावरण दुमदुमून टाकले.
 
श्री स्वामी सेवा मार्गाच्या मूल्य संस्कार आणि युवा प्रबोधन विभागातर्फे दि. १ मे रोजी नाशिकच्या गोल्फ क्लब मैदानावर मूल्य संस्कार मेळावा अभूतपूर्व प्रतिसादात संपन्न झाला. यावेळी गुरुमाऊली श्री मोरे यांनी सेवेकऱ्यांना संबोधित करताना गर्भसंस्कार, बालसंस्कार मूल्य संस्काराचे महत्व अधोरेखित केले. सेवा मार्गाच्या सर्व अठरा विभागांची माहिती देताना अध्यात्म केवळ नावाला आणि सामाजिक उपक्रम जास्तीत जास्त राबवण्यावर सेवामार्गाचा भर असतो असे सांगून गुरुमाऊली श्री मोरे यांनी बालसंस्कार विभागाला सेवामार्गाने झुकते माप दिले, आहे असे नमूद केले.
 
गुरु - मातृ - पितृ पाद्यपूजन, प्रकृती पूजन आणि मूल्यसंस्कार ज्ञानदालन प्रदर्शन...
 
 
सेवामार्गाच्या बालसंस्कार व युवा प्रबोधन विभागातर्फे मूल्य संस्कार मेळाव्याअंतर्गत गुरु मातृ पितृ पाद्यपूजन सोहळा, प्रकृती बीच पूजन सोहळा अपूर्व उत्साहात पार पडला. यावेळी भारत मुक्त अभियानाचा नारा देण्यात आला. सर्वात आकर्षण ठरले ते मूल्यसंस्कार ज्ञानदालन प्रदर्शन..!
 
ज्ञानदालन प्रदर्शनाअंतर्गत मूल्य संस्कारातून गर्भसंस्कार, शिशू संस्कार, वेद विज्ञान संशोधन, सणवार व्रतवैकल्य, पर्यावरण, वास्तुशास्त्र ,आरोग्यशास्त्र व योगासने यांच्या दालनांना सेवेकर्‍यांनी प्रचंड प्रतिसाद दिला. त्याचप्रमाणे जिवंत देखाव्यांचे देखील सर्वांनी कौतुक केले. पर्यावरण रक्षण, वृद्धाश्रम मुक्त भारत अभियान आणि सुसंस्कारित पिढी निर्माण होण्यासाठी यावेळी काढण्यात आलेली संदेश यात्राही सर्वांचे आकर्षण ठरली. यावेळी पालकत्व एक कला या विषयावर डॉ. शलाकाताई शिंदे आणि करिअर मार्गदर्शन या विषयावर डॉ.सुहास पाटील यांचे मार्गदर्शन सत्र पार पडले.
 
धर्मयोद्धा सुरेश चव्हाणके यांचे घणाघाती भाषण...
 
सुदर्शन न्युज चॅनेलचे संपादक व प्रख्यात पत्रकार धर्मयोद्धा श्री. सुरेश चव्हाणके यांनी यावेळी उपस्थित राहून घणाघाती भाषण केले. परमपूज्य गुरुमाऊली श्री आण्णासाहेब मोरे आणि सेवा मार्गाच्या कार्याचा गौरवपूर्ण उल्लेख करून त्यांनी समाज प्रबोधनासाठी सेवामार्गाबरोबरच सुदर्शन टीव्हीचे संपूर्ण सहकार्य राहील अशी ग्वाही दिली. तेव्हा सर्वांनी टाळ्यांचा कडकडाट करून त्यांना प्रतिसाद दिला. चंद्र सूर्य असेपर्यंत श्री स्वामी सेवा मार्ग कार्यरत राहील, असे सांगतानाच हिंदू धर्म जाणून घ्या, धर्म जिवंत ठेवण्यासाठी धर्माभिमानी नवी पिढी जन्माला घाला अशी हाक त्यांनी दिली.
 
महाराष्ट्र गीताने प्रारंभ तर पसायदानाने सांगता... 
 
मूल्य संस्कार मेळाव्याला महाराष्ट्र गीताने प्रारंभ झाला तर पसायदानाने सांगता झाली. श्री स्वामी प्रतिमा पूजन, दीप प्रज्वलन, प्रकृती बीज पूजन यावेळी करण्यात आले. आमदार सीमाताई हिरे यांनीही मूल्यसंस्कार ज्ञानदालन प्रदर्शनाला भेट देऊन कौतुक केले. व्यासपीठावर परमपूज्य गुरुमाऊली श्री मोरे यांच्या समवेत धर्मयोद्धा सुरेश चव्हाणके ,गुरुपुत्र नितीनभाऊ मोरे, गुरुमाता सौ मंदाताई मोरे, नगरसेविका वत्सलाताई खैरे, भाग्यश्रीताई ढोमसे तसेच मधुसूदन महाराज, बाळासाहेब खरात महाराज,ज्येष्ठ नेते सुधाकर बडगुजर ,विठ्ठल जपे, सुनील आडके, विशाल मकवाणी, कावेरीताई घुगे आदी मान्यवर उपस्थित होते.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार