सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

'ऑपरेशन सिंदूर'... भारताने पाकिस्तानात घुसून मारलं; भारतीय सशस्त्र दलांकडून पाकिस्तानातील दहशतवादी तळांवर अचूक हल्ले

भारतीय सेनेच्या खास मोहिमेला 'ऑपरेशन सिंदूर' असं नाव देण्यात आलं होतं.

Sudarshan MH
  • May 7 2025 10:35AM

Operation Sindoor: प्रत्येक भारतीय नागरिक ज्या क्षणांची आतुरतेने वाट पाहत होते तो क्षण अखेर काल रात्री आला. जम्मू - काश्मीरमधील पहलगाम येथे २२ एप्रिलला झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा भारतीय सेनेने घरात घुसून बदला घेतला आहे. पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मिरमधील दहशतवाद्यांचे नऊ तळ उद्ध्वस्त करून 'ऑपरेशन सिंदूर' ही मोहीम राबवण्यात आली. भारतीय वायुदलानं आज मध्यरात्री दीडच्या सुमारास अतिरेक्यांच्या नऊ ठिकाणांवर यशस्वी स्ट्राईक केली आहे.

हा लष्कर आणि हवाई दलाचा संयुक्त ऑपरेशन असा संयुक्त हल्ला होता ज्यामध्ये ७०% पेक्षा जास्त लक्ष्यांवर लष्कराने आणि सुमारे ३०% लक्ष्यांवर हवाई दलाने हल्ला केला. भारतीय हवाई दलाने स्टँड-ऑफ शस्त्रे वापरली. लष्कराने इतर योग्य शस्त्रे आणि प्लॅटफॉर्म व्यतिरिक्त ड्रोन आणि अचूक दारूगोळा वापरला. दोन्ही सेवांनी उत्कृष्टपणे समन्वयित आणि अंमलात आणलेलं असं हे संयुक्त ऑपरेशन होतं.


मिळालेल्या माहितीनुसार, नऊ दहशतवादी तळांवर हल्ला करण्यात आला असून यामध्ये ६२ दहशतवादी मारले गेले आहेत. भारतानं केलेल्या एअर स्ट्राईकमध्ये लष्कर - ए - तैयबाच्या टॉपच्या २ कमांडोंचा खात्मा करण्यात आला आहे. यामध्ये हाफिज अब्दुल मलिक आणि मुदस्सीर या दोघांचा खात्मा करण्यात आला आहे. दरम्यान या हल्ल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 


भारतीय लष्कराने केलेल्या ऑपरेशन सिंदूरवर गृहमंत्री अमित शाह यांनी मोठी प्रतिक्रिया दिली आहे. आपल्या सशस्त्र दलांचा अभिमान आहे. ऑपरेशन सिंदूर हे पहलगाममध्ये आपल्या निष्पाप बांधवांच्या क्रूर हत्येला भारताने दिलेले प्रत्युत्तर आहे. भारत दहशतवादाला मुळापासून नष्ट करण्यासाठी वचनबद्ध आहे, असंही अमित शहा यांनी म्हटलं आहे.

या कृत्यानं नक्कीच एक गोष्ट अधोरेखित केली जात आहे ती म्हणजे हा हल्ला केवळ देशावर नाही तर त्यामागे धार्मिक आणि देशाच्या एकात्मतेवर ही हल्ला असल्याचे बोलले जात आहे. या भ्याड हल्ल्यावेळी महिलांचं कुंकू म्हणजे त्यांच्या पतींना लक्ष करण्यात आलं. दहशतवाद्यांचा हेतू केवळ त्यांना जिवानिशी मारण्याचाच नव्हता, तर भारतीय संस्कृती, देशातील एकता  आणि  देशाच्या आत्म्यावर हल्ला करण्याचा होता. त्यामुळे अनेक निष्पापांचे कुंकू पुसल्या गेलेल्या पीडित कुटुंबियांना काही अंशी न्याय देण्याच्या हेतूने या मोहिमेला 'ऑपरेशन सिंदूर' असे नाव देण्यात आल्याचे बोलले जात आहे.   या सांस्कृतिक आणि भावनिक हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून, भारतीय सैन्याने ही मोहीम सुरू केली आणि त्यात यश ही मिळवले आहे. 

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार