सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

उद्धव ठाकरेंवर टीका; 25 शिवसैनिकांवर गुन्हे दाखल

शिवसैनिकांनी हे कृत्य केल्याचा व्हिडिओ व्हायरल

Sudarshan MH
  • Feb 8 2021 11:47AM

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर आक्षेपार्ह आणि एकेरी भाषेत टीका केल्याने शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून पंढरपूरमधील भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष शिरीष कटेकर यांच्या तोंडाला काळं फासत त्याला साडी नेसवल्याचा प्रकार समोर आला आहे. याचा एक व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. हा प्रकार म्हणजे शिवसेनेची सत्तेची मस्ती आणि गुंडगिरी असल्याचं भाजपानं या व्हिडिओवर प्रतिक्रिया देताना म्हटलं आहे.

 

व्हायरल व्हिडिओत शिरीष कटेकर शिवसेनेचे काही कार्यकर्ते घेरतात आणि त्याच्या अंगावर डोक्यावर काळी शाई ओतताना दिसत आहेत. तसेच भर बाजारातून त्याची धिंड काढताना त्याच्या गळ्यात माळ सदृश्य वस्तू घालताना आणि अंगावर साडी टाकतानाही दिसत आहेत. आक्रमक झालेले हे कार्यकर्ते कटेकर यांना मारहाण आणि शिवीगाळही करताना या व्हिडिओमध्ये दिसत आहेत.

 

दरम्यान, भाजपाच्या सरचिटणीस आणि राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा विजया रहाटकर यांनी हा व्हिडिओ ट्विटरवर शेअर करत शिवसेनेवर निशाणा साधला आहे. किती ही सत्तेची मस्ती अशा शब्दांत त्यांनी शिवसेनेवर सडकून टीका केली आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार