सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

महाराष्ट्रासाठी मोठा दिलासा मुंबईला आलेला निसर्ग चक्रीवादळाचा धोका टळला. मात्र अलर्ट कायम

महाराष्ट्रात येऊन धडकले ला निसर्ग चक्रीवादळाचा आता मुंबईला असलेला धोका टळला असल्याची माहिती  हवामान खात्याने दिली आहे.

Snehal Joshi
  • Jun 4 2020 3:58PM

महाराष्ट्रात येऊन धडकले ला निसर्ग चक्रीवादळाचा आता मुंबईला असलेला धोका टळला असल्याची माहिती  हवामान खात्याने दिली आहे.

 चक्रीवादळ ईशान्य कडे सरकल  असून निसर्ग चक्रीवादळाची तीव्रता कमी झाली आहे. मुंबईच्या पूर्वेला महाराष्ट्रातल्या अंतर्गत भागात 90 किलोमीटर अंतरावर हे चक्रीवादळ शमलं. आता ते पुढे ईशान्येकडे सरकून येत्या तीन तासात तसंच कमी दाबाच्या पट्ट्यात रूपांतरित  होणार. असे हवामान विभागाने सांगितले आहे. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एक नवीन निवेदन प्रसिद्ध करून जनतेचे आभार मानले आहेत.

 अलिबागला धडकलेल्या वादळ मुंबईला येण्याची शक्यता व्यक्त झाल्याने शहरातील आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज होती. दुपारी एक ते दीड च्या सुमारास अलिबागला धडकलेल्या निसर्ग चक्रीवादळाचा फटका मुंबईला देखील बसला. मुंबईच्या समुद्र किनारपट्टी तील  गीता नगर, वरळी, कोळीवाडा, दादर, माहीम, जुहू आणि  वसई परिसरात मोठा पावसाने हजेरी लावली पाऊस धो-धो कोसळत असतानाच वेगाने वाहणारे वारे आणि  सकाळपासून सुरू असलेला पाऊस कोसळत असतानाच  दुपारच्या वेळी पावसाचा वेग वाढला त्यामुळे मुंबईकरांना धडकीच भरली होती.

 या चक्रीवादळामुळे सकाळपासूनच मुंबई शहर आणि उपनगरात पावसाची  जोरदार हजेरी लागली होती. शिवाय  सातत्याने वाहत असलेल्या वाऱ्याच्या वेगाने  नुकसान होत होते. दुपारी पावसाचा आणि वाऱ्याचा वेग वाढू लागला.  अनेक ठिकाणी झाडे कोसळून घटना घडल्या. मुंबई शहर आणि उपनगरात समुद्रकिनारी रहात असलेल्या पश्चिम किनारपट्टीवरील धक्कादायक व समुद्र किनार योजनेच्या वस्त्यांमधील नागरिकांचे स्थलांतर करून त्यांना सुरक्षित ठिकाणी हलवण्या बाबतचे निर्देश देण्यात आले होते. महापालिके तर्फे सुमारे 35 शाळा आतापर्यंत नागरिकांच्या तात्पुरत्या निवासासाठी निश्चित करण्यात आला होता. आणि तिथे स्थलांतरित होण्याचे आवाहन करण्यात आले होते. नागरिक देखील  तेथे स्थलांतरित होत होते. अग्निशमन दल सज्ज  करण्यात आले होते. यामध्ये कलबा, वरळी, बांद्रा, अंधेरी मलाड आणि बोरीवलीचा चा समावेश आहे.

 नियंत्रण कक्षात बसवलेल्या पाच हजारापेक्षा अधिक कॅमेरा द्वारे घडामोडींवर नजर ठेवण्यात आली  होती. पाणी साचण्यांच्या  संभाव्य 300 पेक्षा अधिक ठिकाणी पाणी उपसा करण्यासाठी पंप उपलब्ध करण्यात आली होती. धोकादायक इमारतींची पाहणी करून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला होता. कोसळलेल्या झाडांना हलवण्यासाठी कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली होती. पथके तैनात करण्यात आली होती. अतिसंवेदनशील ठिकाणी आणि रुग्णालयांमध्ये विजेसाठी जनरेटर उपलब्ध करुन देण्यात आले होते.

 वीस ते पंचवीस हजार नागरिकांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्यात आले होते. चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर समुद्र किनारपट्टी व संभाव्य धोका असलेल्या मुंबईतील विविध भागातून सुमारे 20 ते 25 हजार नागरिकांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्यात आले. तर सुमारे 30 हजार नागरिकांनी महानगरपालिकेच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन स्वतः स्थलांतर केले होते. नागरिकांनी स्थलांतर करावे म्हणून जागोजागी आव्हान करण्यात येत होते. स्थलांतरित नागरिकांसाठी 
निवाऱ्यासह जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती. चक्रीवादळ नंतर घरी परतण्यापूर्वी या नागरिकांची आरोग्य तपासणी देखील करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. दरड कोसळण्याच्या संभाव्य ठिकाणावरून देखील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी नेण्यात आले होते.

 चक्रीवादळाच्या पार्श्‍वभूमीवर झालेल्या नुकसान बद्दल सांगायचे तर अनेक झाडं रस्त्यावर कोसळली . लहान मोठ्या अनेक प्रकारच्या गाड्यांवर झाड कोसळल्याने लोकांच्या वाहन संपत्तीचे  मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मात्र जीवितहानी झाल्याचे कुठे ऐकायला आले नाही.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार