सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को सहयोग करे

Donation

Coronavirus : अर्थव्यवस्थेला आधार देण्यासाठी RBI च्या महत्त्वाच्या घोषणा, शेअर बाजारात सावध प्रतिक्रिया

कोरोना संकटात भारतीय अर्थव्यवस्थेला आधार देण्यासाठी गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी महत्त्वाच्या घोषणा केल्या. यानंतर शेअर बाजारात सावध प्रतिक्रिया पाहायला मिळाली.

Sudarshan MH
  • Apr 17 2020 12:31PM

नवी दिल्ली : कोरोना संकटाच्या पार्श्वभूमवर भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी आज (17 एप्रिल) मीडियाशी संवाद साधला. कोरोना संकटात भारतीय अर्थव्यवस्थेला आधार देण्यासाठी गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी महत्त्वाच्या घोषणा केल्या. यानंतर शेअर बाजारात सावध प्रतिक्रिया पाहायला मिळाली. सेन्सेक्समध्ये मोठी पडझड झाली नसली तरी सुरुवातीच्या सत्रात 1000 अंकांच्या पार पोहोचलेला सेन्सेक्स शक्तिकांत दास यांच्या पत्रकार परिषदेनंतर 700 अंकांपर्यंत खाली आला. आरबीआय गव्हर्नर आपल्या पत्रकार परिषदेत काही मोठ्या घोषणा करतील, अशी गुंतवणूकदारांची अपेक्षा होती. परंतु त्यांच्या पदरी फारसं काही पडलं नाही. त्याचा परिणाम भारतीय शेअर बाजारातही दिसला.


सुरुवातीच्या सत्रात सेन्सेक्समध्ये 1000 अंकांची मजबुती पाहायला मिळाली होती, त्यामुळे सेन्सेक्स 31 हजार 500 अंकांच्या पार पोहोचला होता. तर सुमारे 250 अंकांसह निफ्टी 9,300 अंकांपर्यंत पोहोचला होता. मात्र आरबीआयच्या पत्रकार परिषदेनंतर शेअर बाजारात सेन्सेक्स 700 अंक तर  निफ्टी 200 अंकांवर आला.


शक्तिकांत दास यांची दुसरी पत्रकार परिषद
लॉकडाऊनमधील शक्तिकांत दास यांची ही दुसरी पत्रकार परिषद आहे. याआधी शक्तिकांत दास यांनी 27 मार्च रोजी पत्रकारांशी संवाद साधला होता. त्यावेळी त्यांनी रेपो रेटमध्ये 0.75 टक्क्यांच्या कपातीची घोषणा केली होती होती.


RBI कडून मोठा दिलासा, रिव्हर्स रेपो रेटमध्ये कपातीसह अनेक महत्वाच्या घोषणा

आरबीआय गव्हर्नर यांच्या पत्रकार परिषदेतील महत्वाचे मुद्दे


- नाबार्ड, सीआयडीबीआय, एनएचबीला 50 हजार कोटींचे पॅकेज
- रिव्हर्स रेपो रेट 25 बेसिक पॉईंटने कमी, रिव्हर्स रेपो रेट 3.75 टक्के
- 1.9 टक्के विकास दर राहण्याची शक्यता
- कोरोनामुळे निर्यात घटली, वीजेची मागणीही कमी झाली
- ऑटोमोबाईल क्षेत्रातील विक्रीत मोठी घट
- जी 20 देशांमध्ये सर्वात मजबूत अर्थव्यवस्था भारताची
- अन्य देशांच्या तुलनेत भारताची चांगली स्थिती
- देशात इंटरनेट बँकिंगद्वारे चांगले काम
- अडचणींमध्येही एटीएमद्वारे चांगले काम
- बाजारात चलनाची कमतरता भासू न देण्यावर भर
- आरबीआय देशात नवीन छापलेले चलन आणणार

या आठवड्यात शेअर बाजार कसा होता?
या आठवड्यात शेअर बाजारात मोठे चढ-उतार पाहायला मिळाले. गुरुवारी (16 एप्रिल) सेन्सेक्स 222.80 अंक म्हणजेच 0.73 टक्क्यांच्या वाढीसह 30,602.61 अंकांवर पोहोचला होता. तर राष्ट्रीय निर्देशांक अर्थात निफ्टी 67.50 अंक म्हणजेच 0.76 टक्क्यांच्या वाढीसह 8,992.80 अंकांवर बंद झाला.


- बुधवारी (15 एप्रिल) सकाळच्या सत्रात सेन्सेक्समध्ये 1,346 अंकांच्या कक्षेत चढ-उतार पाहायला मिळाले. पण कारभाराच्या अखेरच्या सत्रात 310 अंक किंवा 1.01 टक्क्यांच्या घसरणीसह 30,379 अंकांवर बंद झाला. अशाचप्रकारे निफ्टी 68.55 अंक किंवा 0.76 टक्के घसरणीसह 8,925.30 अंकांवर बंद झाला.


-तर मंगळवारी म्हणजेच 14 एप्रिलला डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीमुळे आर्थिक व्यवहार बंद होते. यामुळे शेअर बाजारातील व्यवहारही बंद होते.


- आठवड्याच्या सुरुवातीला पहिल्या दिवशी सोमवारी सेन्सेक्स 469.60 अंकांच्या घसरणीसह 30,690.02 अंकांवर बंद झाला. याचप्रकारे निफ्टी 118.05 अंकांनी कोसळून 8,993.85 अंकांवर बंद झाला.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार