सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

सुदर्शन न्यूज ईफेक्ट: मेजवानी देणाऱ्या नगरसेवकावर गुन्हा दाखल तथापि मोठे मासे कारवाईच्या जाळ्यातून सुटू नये; लोकांची अपेक्षा

नगरसेवकाच्या मेजवानीचे व खानसामा पॉझिटिव आढळल्याचे प्रकरण सुदर्शन न्यूजने राष्ट्रीय स्तरावर बातमी झळकवून ऊघडकीस आणले होते. त्याचीच दखल घेत जिल्ह्यातील संचारबंदी आदेश आणि साथ रोग प्रतिबंधक कायदा

Aishwarya Dubey
  • Jun 12 2020 12:20PM
नंदुरबार  : नगरसेवकाच्या मेजवानीचे व खानसामा पॉझिटिव आढळल्याचे प्रकरण सुदर्शन न्यूजने राष्ट्रीय स्तरावर बातमी झळकवून ऊघडकीस आणले होते. त्याचीच दखल घेत जिल्ह्यातील संचारबंदी आदेश आणि साथ रोग प्रतिबंधक कायदा व राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायद्याचा भंग केल्याबद्दल नंदुरबार येथील परवेजभाई करामतभाई खान यांच्याविरुद्ध तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांनी तालुका पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला आहे. 
परंतु ही कारवाई एवढ्यावर थांबू नये असा जनतेचा सूर आहे. पॉझिटिव्ह आढळलेला खानसामा या मेजवानीशी संबंधित आहे किंवा नाही? हे उघड केले जावे; मेजवानीला उपस्थित सर्व जबाबदार अधिकारी आणि राजकीय पुढारी यांची यादी समोर आणली जावी; हे लोकांना चौकशी समितीकडून अपेक्षित आहे. नगरसेवक परवेज खान यांच्या खुलाशातील सर्व दावे खोटे ठरत असल्याने सदर पोझिटीव्ह खानसामा तेथे नव्हता, या परवेज खान यांच्या म्हणण्याविषयी नागरिकांच्या मनात शंका आहे.कायदेशीर कार्यवाही व बदनामीच्या भीतीने संबंधित राजकीय पुढारी व अधिकारी समोर न येता व स्वतः ला क्वारन्टाईन न करता पूर्ण शहरात करोनाच्या विस्फोट घडवतील यात शंका नाही. म्हणून मेजवानीला उपस्थित एकूण एक व्यक्तीचा शोध घेऊन कवरन्टीन करणे भाग आहे. त्या प्रक्रियेला अद्याप सुरुवात का झाली नाही यावर शहरवासी बोलू लागले आहेत. दरम्यान गुन्हा नोंद झाल्या विषयीच्या शासकीय माहितीत म्हटले आहे की, परवेज खान यांनी 30 जून 2020 पर्यंत मनाई आदेश लागू असताना सदर आदेशाचा भंग करून मौजे झराळी येथील फार्म हाऊसवर मुलाच्या लग्न समारंभानिमित्त स्नेह भोजनाचे आयोजन केले होते. कार्यक्रमास 50 व्यक्तिंची परवानगी असताना  त्यापेक्षा अधिक व्यक्तिंना आमंत्रित करण्यात आले होते. अशाने कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होण्याचा धेाका असल्याने आणि संसर्गजन्य आजार पसरून मानवी जिवीतास धोका उत्पन्न होण्याची ही कृती असल्याने प्रकरणो गांभिर्य लक्षात घेऊन तहसीलदार थोरात यांनी भारतीय दंड संहितेचे कलम 188, 268, 269, 290, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 चे कलम 54 आणि साथीचे रोग अधिनियम 1897 चे कलम 3 नुसार हा गुन्हा दाखल केला आहे.
स्नेहभोजन प्रकरणाची माहिती मिळताच जिल्हाधिकारी डॉ.राजेद्र भारुड यांनी उपविभागीय अधिकाऱ्यांना प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार तहसीलदार आणि पोलीस निरीक्षक नंदुबार यांची संयुक्त समिती नेमण्यात आली होती.
जिल्ह्यात कोविड-19 च्या संसर्गावर बऱ्यापैकी नियंत्रण असल्याने संचारबंदीत शिथीलता देण्यात आली आहे. त्याचा उपयोग केवळ अत्यावश्यक बाबींसाठी नागरिकांनी करावा. कोरोनाचा संसर्ग अधिक प्रमाणात होणार नाही यासाठी प्रशासनाने दिलेल्या सुचनांचे पालन करावे. लग्न समारंभात 50 पेक्षा अधिक व्यक्तिंना आमंत्रित करू नये. रात्री 9 ते पहाटे 5 या कालावधीत घराबाहेर अनावश्यक फिरू नये. बाहेर फिरताना चेहऱ्यावर मास्क घालावा आणि शारिरीक अंतराचे पालन करावे. सार्वजनिक ठिकाणी गर्दी टाळावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी केले आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार