सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

आता शाळांची मनमानी बंद, केंद्राकडून नवे नियम समोर आले

या व्यतिरिक्त काही गृहपाठ देऊन इतर उपक्रम राबविण्याची शिफारसही केंद्रीय मंत्रालयाने केली आहे. मुलांचा मानसिक आणि शारिरीक विकास होईल याकडे लक्ष देण्यासही मंत्रालयाने सांगितलं आहे

Aishwarya Dubey
  • Jul 15 2020 11:37AM

कोरोना आणि लॉकडाऊनमुळे  दररोजची सगळीच कामे आता बदलून गेली आहेत. प्रत्येकाल आता जास्त काळजी घ्यावी लगात आहे. सगळ्यांना चिंता आहे ती विद्यार्थी आणि त्यांच्या शिक्षणाची. सोशल डिस्टन्सिंग हा कोरोनावर उपाय असल्याने शाळेत पूर्वीसारखं आता जाता येणार नाही. ही परिस्थिती किती दिवस असेल याचाही अंदाज अजुन कुणालाच नाही त्यामुळे सर्व शाळा आणि महाविद्यालयांनी Online classes सुरू केले आहेत. त्यामुळे मुलं तासंतास आता मोबाईलसमोर राहात असल्याने पालकांची चिंता वाढली आहे. या पार्श्वभूमीवर पालक संघटना आणि तज्ज्ञांनी नियमावली जाहीर करण्याची मागणी केली होती. त्यानंतर  केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने शाळा आणि महाविद्यालयांसाठी नवी नियमावली जाहीर केली आहे.त्यामुळे Online classesच्या नावावर काही शाळांनी सुरू केलेल्या मनमानीला चाप लागणार आहे.

कोरोनामुळे बाहेर खेळण्यावर मुलांना बंधणं आली आहेत. त्यात सगळाच अभ्यास ऑनलाईन असल्याने मुलं मोबाईल आणि लॅपटॉप समोर बसून राहत आहे. त्यामुळे मुलांच्या शारिरीक आणि मानसिक आरोग्याविषयी पालकांना चिंता वाटत होती. त्यामुळे तज्ज्ञांच्या शिफारसीनंतर केंद्रीय मनुष्यबळ मंत्रालयाने हे नवे नियम जाहीर केले आहेत.

Pre Primary – पालक आणि मुलांसाठी ठरवून दिलेल्या दिवशी फक्त 30 मिनिटे

Classes 1 to 12 – सगळ्यांसाठी NCERTने अभ्यासक्रम आखून दिला आहे. त्याप्रमाणे अभ्यासक्रम घेतला जावा.

Classes 1 to 8 – प्रत्येक दिवशी 30- 45 मिनिटांचे दोन सेशन्स. त्यापेक्षा जास्त नको

Classes 9 to 12 - प्रत्येक दिवशी 30- 45 मिनिटांचे चार सेशन्स.

 

या व्यतिरिक्त काही गृहपाठ देऊन इतर उपक्रम राबविण्याची शिफारसही केंद्रीय मंत्रालयाने केली आहे. सतत स्क्रिन समोर राहिल्यामुळे मुलांच्या डोळ्यांवरही परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्याचबरोबर सतत घरी बसून राहिल्यामुळे त्यांच्या खेळण्यावरही मर्यादा आल्या आहेत. त्यामुळे व्यायाम होत नाही. त्याचा परिणाम मुलांच्या जडण घडणीवर होऊ शकतो.

या सगळ्यांचा विचार करून शाळा-पालक आणि विद्यार्थी यांनी मिळून या संकटाच्या काळात पुढे गेलं पाहिजे असं मत शिक्षण तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार