सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

'ग्रीन झोन'मध्ये कोरोनाचा शिरकाव, चंद्रपुरात आढळला पहिला पॉझिटिव्ह रुग्ण

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने नुकतीच महाराष्ट्रातील रेड, आरेंज आणि ग्रीन झोन्सची यादी जाहीर केली आहे. या यादीत ग्रीन झोनमध्ये असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव झाला आहे.

Sudarshan MH
  • May 3 2020 12:41PM

चंद्रपूर, 2 मे: केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने नुकतीच महाराष्ट्रातील रेड, आरेंज आणि ग्रीन झोन्सची यादी जाहीर केली आहे. या यादीत ग्रीन झोनमध्ये असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव झाला आहे. चंद्रपुरीत कोरोना पॉझिटिव्ह पहिला रुग्ण आढळल्याची माहिती याची माहिती अधिष्ठाता डॉ. एस.एस. मोरे यांनी दिली आहे. यामुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये दहशत पसरली आहे. आता ग्रीन झोन दर्जा संपुष्टात येतो की काय, अशी भीतीही व्यक्त केली जात आहे.

शहरातील कृष्णनगर भागात शु्क्रवारी 50 वर्षीय व्यक्तीमध्ये लक्षणं आढळली होती. त्याला जिल्हा रुग्णालयातील विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले होते. शनिवारी सकाळी स्त्राव नमुने तपासणीसाठी केले होते. व्यक्तीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याची माहिती मिळाली आहे. त्यानंतर शहरातील कृष्णनगर भाग आता सील करण्यात येणार आहे. याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात प्रशासनाची तातडीची बैठक बोलावण्यात आली आहे. यापुढे चंद्रपुरातील नागरिकांना अधिक काळजी घेणे गरजेचे आहे.

दरम्यान, राज्यात कोरोनाचं थैमान सुरुच आहे. कोरोनाबाधित रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. लॉकडाऊनचे निर्बंध अधिक कठोर करण्यात आलं असतानाही कोरोनाबाधिताची संख्या नियंत्रणात येत नसल्याने चिंता वाढली आहे. धक्कादायक म्हणजे राज्यात शनिवारी 36 रुग्णांचा मृत्यू झाला असून 790 एकूण नवीन रुग्णांची नोंद घेण्यात आली आहे. तसेच राज्यात आत्तापर्यंत दोन हजार रुग्णांना डिस्चार्ज दिला आहे.मुंबईत 27, पुण्यात 3, अमरावतीत 3, वसई-विरार 1, औरंगाबाद-1 मृत्यू झाला आहे. याशिवाय पश्चिम बंगालमधील एकाचा मुंबईत मृत्यू झाला आहे.मृतांमध्ये 28 पुरुष तर 8 महिला आहेत. कोरोनामुळे राज्यात मृतांची एकूण संख्या 521 वर पोहोचली आहे.

दरम्यान, राज्यातील दोन शहरं मुंबई आणि पुणे ही कोरोना व्हायरसची हॉटस्पॉट बनली आहेत. दोन्ही शहरात कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत असल्यानं प्रशासनासमोर मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.

दुसरीकडे, मुंबईत आज 547 नवे कोरोना रुग्ण आढळले असून कोरोणाच्या एकूण रुग्णांची संख्या 8172 वर पहोचली आहे. आज कोरोणामुळे 27 रुग्णांचा मृत्यू झाला असून आजवर मुंबईत एकूण 322 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच 137 जण कोरोनमुक्त झाले असून आजवर 1708 पूर्णपणे बरे होऊन घरी गेले आहेत.

पुण्यात दिवसभरात 107 पॉझिटिव्ह रुग्ण आढळली असून चार करोनाबाधीत रुग्णाचा मृत्यू आहे. डॉ. नायडू हॉस्पिटलमध्ये एकूण 413 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. कोरोनाचा संसर्ग झालेले 53 रुग्ण ठणठणीत बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर 67 क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यात 11 रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. दरम्यान, पुण्यात एकूण कोरोना पॉझिटिव्ह रूग्णसंख्या 1718 आहेत. आतापर्यंत एकूण 95 जण कोरोनामुळे दगावली आहेत.

दरम्यान, जगातल्या इतर देशांपेक्षा भारतात कोरोनाचा उद्रेक नियंत्रणात असला तरी संख्येत दररोज वाढ होत आहे. कोरोबाधितांची संख्या आता 37776 एवढी झाली आहे. तर मृत्यूचा आकडा 1223वर गेला आहे. जगात आत्तापर्यंत 32 लाख लोक बाधित असून 2 लाख 28 हजार जणांचा त्यामुळे मृत्यू झाला आहे. देशात कोरोना व्हायरसचं ‘म्युटेशन’ झालं आहे का याचा अभ्यास ICMR चे संशोधक करत आहेत.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार