सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

भाजप चे दमदार ’आमदारांचा यावर्षी वाढदिवस कोरोना योद्धा साठी समर्पित

आमदारांचा यावर्षी वाढदिवस कोरोना योद्धा साठी समर्पित

Sudarshan MH
  • Nov 26 2020 7:43PM
 
प्रतिनिधी दिपक चव्हाण पुणे
 
 
देशात कोरोना महामारीच्या पार्श्वूमीवर पिंपरी चिंचवड शहराचे भाजपा शहर अध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांनी यावर्षी आपला वाढदिवस ‘कोरोना योद्धयांना’साठी समर्पित केलाआसुन संपूर्ण महाराष्ट्रात दमदार आमदार’म्हणून अशी ओळख असलेल्या आमदार महेश लांडगे यांनी आपले समर्थक- कार्यकर्ते यांना वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा करा,अशी साद घातली. त्याला समर्थकांनी तितक्याच प्रमाणिकपणे प्रतिसाद दिला आहे।
 
पिंपरी-चिंचवडमधील राजकीय पटलावरील ‘इव्हेंट’बाज पैलवान म्हणून आमदार महेश लांडगे यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. मात्र, यावर्षी कोरोनारुपी संकटाने संपूर्ण जगभारात थैमान घातले. या परिस्थितील गेल्या आठ महिन्यांपासून आमदार लांडगे आणि समर्थक भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून सर्वसामान्य लोकांना मदत करण्यासाठी झटत आहेत. 
मास्क फॉर सेफ पीसीएमसी मोहीम, कम्युनिटी किचन, कोरोना जनजागृती, प्लाझ्मा डोनेशन, स्वयंस्फूर्तीने लॉकडाउन, रक्तदान शिबीर, कोविड केअर सेंटर, डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी संवाद यासह अनेक उपक्रम आमदार लांडगे यांनी हाती घेतले. त्या उपक्रमांमध्ये समर्थक- कार्यकर्तेही उत्स्फूर्तपणे सहभागी झाले आहेत. 
दरम्यान, २७नोव्हेंबर रोजी होणारा वाढदिवस आणि अभिष्ठचिंत न सोहळा म्हणून लांडगे समर्थकांसाठी आनंदोत्सव असतो. प्रतिवर्षी भोसरीतील गावजत्रा मैदानावर हजारो चाहत्यांची गर्दी होते. भव्य-दिव्य कार्यक्रमांत आमदार लांडगे चाहत्यांचे अभिवादन स्वीकारतात. विशेष म्हणजे, भोसरीसह संपूर्ण पिंपरी-चिंचवडमध्ये जाहिरात फलक, शुभेच्छांची होर्डिंग्सच्या भिंती उभारल्या जातात. २६ नोव्हेंबरच्या सायंकाळीपासून केक कापण्याचा कार्यक्रम सुरु होतो. दुसऱ्यादिवशी रात्री उशीरापर्यंत केक कापणे आणि आयोजित कार्यक्रमांना हजेरी लावणे अशी जोरदार रेलचेल सुरू असते. 
पण, यावर्षी आमदार लांडगे यांनी कार्यकर्ते-समर्थक आणि हितचिंतकांना आवाहन केले. वाढदिवस साधेपणाने आणि कसलाही उत्सव साजरा न करता झाला पाहिजे. कोरोना योद्धांना समर्पिंत केलेला वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा व्हावा, अशी साद घालताच समर्थकांनी नियोजन सुरू केले. रक्तदान शिबीर, आरोग्य शिबीर, प्लाझ्मादान शिबीर, कोरोना योद्धांचा सन्मान, गरजू नागरिकांना मदत, अनाथाश्रमामध्ये मदत असे विविध सामाजिक उपक्रम आयोजित करण्यात आले. त्यामुळे भोसरीसह पिंपरी-चिंचवडमधील लांडगे समर्थक- हितचिंतकांनी लांडगे यांनी घातलेल्या ‘साद’ ला प्रामाणिक प्रतिसाद दिला, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
 
आमदार लांडगे यांचा निर्णय सामाजिक जाणिवेचा : माजी महापौर नितीन काळजे याबाबत बोलताना माजी महापौर नितीन काळजे म्हणाले की, प्रतिवर्षी दादांचा वाढदिवस म्हणजे आमच्यासाठी आनंदोत्सव असतो. महिनाभर अगोदरच वाढदिवस सेलिब्रेशनची तयारी सुरू होते. ठिकठिकाणच्या मंदिरांमध्ये महाआरती, अभिषेक असेही कार्यक्रम होतात. भोसरी गावजत्रा मैदानावर होणार अभिष्ठचिंतन सोहळा तर अविस्मरणीय असतो. पण, यावर्षी कोरोनारुपी महासंकटामध्ये आम्ही आमचे अनेक निकटवर्ती हितचिंत गमावले आहेत. अनेकांच्या घरामध्ये यावर्षी दिवाळी साजरी झाली नाही. त्यामुळे अशा परिस्थितीत वाढदिवस साजरा करणे योग्य होणार नाही, अशी भूमिका दादांनी घेतली. ती आम्हा सर्व कार्यकर्त्यांना अनुकरणीय वाटते. दादांना सामाजिक जाणीव आहे. त्या जाणिवेतून घेतलेला निर्णय आदर्शवत आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

0 Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार