सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

कर्जत येथील सैनिक बँकेतील निराधार योजना रक्कम अपहार प्रकरण. नाशिक

निराधार योजना रक्कम अपहार प्रकरण. नाशिक

Sudarshan MH
  • Nov 24 2020 6:27PM

अहमदनगर

सैनिक सहकारी बँकेत शासकीय अनुदान हडप झाल्याने सहकार आयुक्त यांच्या पत्राची  जिल्हाधिकारी यांनी सदर गंभीर दखल घेऊनही कर्जत तहसीलदार व पोलिस निरीक्षक हे शाखाआधिकारी व संचालक मंडळाला पाठीशी घालत असून शासकीय गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ करत असल्याने संबधित आधिकाऱ्यावर कारवाई व्हावी व  शासकीय रक्कम हडप करणाऱ्या सैनिक बँक अधिकारी याच्यावर गुन्हे दाखल होण्यासाठी
नाशिक आयुक्त  कार्यालय येथे  अन्याय निवारण,निर्मूलन सेवा समितीचे नगर जिल्हाध्यक्ष अरुण रोडे,  पारनेर तालुका अध्यक्ष पप्पू कासोटे, जिल्हा सचिव वैभव पाचारने,भरत हाटावकर, विनायक गोस्वामी उपोषाणास बसले आहेत.
       सविस्तर माहिती अशी की पारनेर तालुका सैनिक सहकारी बँक शाखा कर्जत येथे शाखाआधिकारी,क्लार्क यांनी संगनमताने व वरिष्ठांच्या आशीर्वादाने संजय गांधी निराधार योजनेतील बँकेत जमा होणाऱ्या रक्कमेत अपहार केल्याची तक्रार वैभव पाचारने यांनी जिल्हाआधिकारी यांना केली  होती.  जिल्हाधिकाऱ्यांनी बँकेतील घोटाळ्याची दखल घेऊन सहकार आयुक्तांना विशेष लेखापरीक्षका मार्फत सखोल तपासणी करण्याची पत्र दिले होते. विशेष लेखापरीक्षक अहमदनगर यांनी  आयुक्त यांच्या पत्राने तपास करून तसा अहवाल सहकार आयुक्तांना दिला होता त्यावर  सहकार आयुक्त अनिल कवडे यांनी  सैनिक सहकारी बँक शाखा कर्जत या शाखेत संजय गांधी निराधार योजनेत अपहार झाला असून संबंधितावर शासकीय गुन्हा दाखल करून सखोल तपास करण्याचे पत्र जिल्हाधिकारी यांना दिले आहे. असे असतानाही शासकीय गुन्हा  का दाखल होत नाही?
 त्यामुळे सदर अधिकारी व बँक कर्मचारी यांची  आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखा अहमदनगर यांचे मार्फत चौकशी करून गुन्हा दाखल व्हावा,
सैनिक बँक संचालक नातेवाईक  निःयम बाह्य नोकर भरतीची चौकशी व्हावी या साठी उपषोंन करत असल्याचे अरुण रोडे यांनी सांगितले.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार