सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

पदवीधर मतदारसंघ निवडणूक,१ डिसेंबरला मतदान:विभागात आदर्श आचारसंहिता लागू

भारत निवडणूक अायोगाने महाराष्ट्र विधान परिषदेसाठी नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या द्विवार्षिक निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर केला.नागपूर विभाग मतदारसंघासाठी १ डिसेंबर २०२० रोजी मतदान घेण्यात येणार आहे.

सौजन्य__ सत्ताधीश
  • Nov 2 2020 11:36PM
भारत निवडणूक अायोगाने महाराष्ट्र विधान परिषदेसाठी नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या द्विवार्षिक निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर केला.नागपूर विभाग मतदारसंघासाठी १ डिसेंबर २०२० रोजी मतदान घेण्यात येणार आहे.निवडणूकीची घोषणा होताच विभागात आदर्श आचारसंहिता लागू झाली असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तसेच विभागीय आयुक्त डॉ.संजीव कुमार यांनी दिली. महाराष्ट्र विधान परिषद द्विवार्षिक निवडणूकीसाठी भारत निवडणूक अायोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केला असून निवडणूकीची अधिकसूचना गुरुवार,दि. ५ नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. नामनिर्देशन पत्र सादर करण्याची अंतिम तारीख १२ नोव्हेंबर २०२०,नामनिर्देशनपत्राची छाननी १३ नोव्हेंबर २०२०,उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख १७ नोव्हेंबर २०२०,१ डिसेंबर २०२० रोजी सकाळी ८ ते सांयकाळी ५ पर्यंत मतदान,मतमोजणी ३ डिसेंबर २०२० तसेच निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याची तारीख ७ डिसेंबर २०२० अशी राहणार आहे. करोनामुळे बराच काळ लांबणीवर पडलेली पदवीधर मतदारसंघाची निवडणूक अखेर ऐन दिवाळीच्या तोंडावर घोषित झाल्याने उमेदवारीकडे डोळे लावून बसलेल्यांच्या काळजाचे ठोके ही चूकलेत. भारतीय जनता पक्ष्ाकडून प्रा.अनिल सोले यांनी गेल्यावेळी पदवीधर मतदारसंघातून बाजी मारत विधान परिषद गाठली होती. ओबीसीचे नेते तसेच धनवटे महाविद्यालयाचे प्राचार्य बबनराव तायवाडे त्यावेळी त्यांचे प्रतिद्वंदी होते,त्यापूर्वी केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांनी पदवीधर मतदासंघांचे दोन वेळा प्रतिनिधित्व केले.यावेळी मात्र काँग्रेसचे ॲड..अभिजित वंजारी हे मैदानात असणार आहे परिणामी भारतीय जनता पक्ष्ातर्फे घोषित होणा-या उमेदवाराला यावेळची निवडणूक ही पूर्वीसारखी सोपी देखील रहाणार नसून यावेळी संपूर्णत:जुनी मतदार यादी निरस्त करुन नव्याने मतदार यादी बनवण्यात आली आहे. जून महिन्यात करोना काळात ही निवडणूक पुढे ढकलावी अशी जनहित याचिका प्रजासत्ताक भारत पक्ष्ाचे संस्थापक लक्ष्मण यांनी ॲड.असीम सरोदे यांच्याद्वारे उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. मात्र न्यायालयाने निवडणूक प्रक्रियेत हस्तक्ष्ेप करणार नाही,असे म्हणत याचिका फेटाळून लावली.याचिकेप्रमाणे नागपूर मतदारसंघात मतदार नोंदणी प्रमाण १.२३ टक्के असून शिक्ष्ति लोकसंख्येच्या प्रमाणात किमान ५० टक्के पदवीधर मतदारांची नोंदणी व्हायला पाहिजे,असा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता. 

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार