सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

सातपुड्याच्या दऱ्याखोऱ्यात दरवर्षी मोठ्या प्रमाणात सीताफळाचे उत्पन्न घेतले जाते

सातपुड्यातील रानमेव्याला देखिल कोरोनाचा फटका बसला आहे.

Sudarshan MH
  • Oct 20 2020 1:09PM

 सुदर्शन न्युज (केतन रघुवंशी ) नंदुरबार 

तळोदा, अक्कलकुवा,शहादा,खापर,बोरद, इत्यादि शहराच्या ठिकाणी सातपुड्यात शेतकरी हे रात्रीपासून सीताफळ विक्रीला आणत असतात.रात्रीच संपूर्ण सीताफळ विक्री होत असायची तर पहाटे   विक्रीसाठी आणणाऱ्यांची सीताफळ देखील सकाळी दहा वाजेपर्यंत पूर्ण विकली जास्त असायची. परंतु यावर्षी संपूर्ण दिवसभर बसून देखील सीताफळ विक्री होत नसल्याचे चित्र दिसून येत आहे.

           करुणा विषयीच्या प्रादुर्भावामुळे खवा यांनी व ग्राहकांनी सिताफळ खरेदीकडे यावर्षी पाठ फिरवल्याचे दिसून येत आहे सिताफळा मुळे सर्दी ताप खोकला यांसारख्या आजारांचा संसर्ग होऊ नये म्हणून अनेक जण सीताफळ खाणे टाळत असल्याचे सांगितले जात आहे त्याच्यात थेट परिणाम सिताफळ खरेदी-विक्रीवर झाला आहे. शुक्रवारच्या आठवडे बाजारात देखिल त्याचा प्रत्यय आला.बाजाराचा दिवस असताना देखील दिवसभर सातपुद्यातून आलेल्या होलसेल विक्रेत्यांना सीताफळ घेऊन बाजारात बसावे लागल्याचे दिसून आले

 

सातपुड्याच्या रानमेवा म्हणून प्रसिद्ध असलेले सीताफळ बाजारात दाखल झाले असून कोरोनाच्या धास्तीमुळे ग्राहकांनी सिताफळ खरेदीकडे पाठ फिरविल्याचे चित्र आहे.त्यामुळे सातपुड्यातील रानमेव्याला देखिल कोरोनाचा फटका बसला आहे.

             सातपुड्याच्या दऱ्याखोऱ्यात दरवर्षी मोठ्या प्रमाणात सीताफळाचे उत्पन्न घेतले जाते जळगाव तालुक्याचा अक्कलकुवा व तालुक्यात तील पर्वतरांगात मोठ्या प्रमाणात सीताफळाची झाडे असून साधारणतः ऑक्‍टोबर नोव्हेंबर या महिन्यात सीताफळ विक्रीसाठी बाजारपेठेत दाखल होत असतात. रासायनिक खतांचा वापर न करता संपूर्ण सेंद्रिय व नैसर्गिकरित्या पिकवलेली सातपुड्यातील गावरान सीताफळांच्या गोडवा व रसाळपणा अधिक असल्याने सातपुड्यात उत्पादित होणाऱ्या सीताफळाला जिल्ह्यासह संपूर्ण उत्तर महाराष्ट्र व शेजारील गुजरात राज्यात मोठी मागणी असते. 

 

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

0 Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार