सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

डाकीणीच्या संशयावरून महिलेला मारहाण, ५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

डाकीण बनुन मुलाला खावुन जिवे ठार मारल्याचा संशय घेत कुटुंबाने महिलेला मारहाण केल्याची घटना सरसाणी येथे घडली आहे. याप्रकरणी ५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Sudarshan MH
  • Sep 2 2022 9:31AM

धडगाव - डाकीण बनुन मुलाला खावुन जिवे ठार मारल्याचा संशय घेत कुटुंबाने महिलेला मारहाण केल्याची घटना सरसाणी येथे घडली आहे. याप्रकरणी ५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, सरसाणी येथे हनवारीपाड्यातील सपना सुभाष पाडवी (३१) या महिलेने डाकीण बनुन गावातील वेरंग्या कागडा पाडवी याला खावुन मारुन टाकले,असा संशय घेऊन कागडा माद्या पाडवी,उदेसिंग वेरंग्या पाडवी,निर्मल वेरंग्या पाडवी,विरसिंग कागडा पाडवी,रेमतीबाई वेरंग्या पाडवी (सर्व रा.सरसाणी) यांनी सपना पाडवी यांच्या घरासमोर जाऊन तु गाव सोडून निघून जा, तु डाकीण आहेस, आमच्या मुलाला खावुन गेली,असे सांगून सपना पाडवी यांना हाताबुक्क्यंनी मारहाण केली.सदर घटना २५ ऑगस्ट रोजी सायंकाळी सहा वाजता घडली.याप्रकरणी वरील आरोपींविरुद्ध धडगाव पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक गोकुळ औताडे करीत आहेत.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार