सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

छ.संभाजीनगर जिल्ह्याच्या विकासाला प्रथम प्राधान्य- संदीपान भुमरे

स्वातंत्र दिनानिमित्त ध्वजारोहण मंत्री भुमरे यांच्या हस्ते झाले.

Abhimanyu
  • Aug 15 2022 8:27PM
कोविड लसीकरण, प्रधानमंत्री मातृत्व वंदन, मतदार नाव नोंदणी, संतपीठाचा विकास, वृक्ष लागवड, सिंथेटिक ट्रॅक, महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती आदींसह जिल्ह्यात विविध योजनांची यशस्वी अंमलबजावणी करण्यात येत आहे. यातून जिल्ह्याचा विकास होतो आहे. यापुढेही जिल्ह्याच्या विकासाला प्रथम प्राधान्य राहणार असल्याची ग्वाही रोजगार हमी योजना व फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे यांनी दिली.

स्वातंत्र दिनानिमित्त ध्वजारोहण मंत्री भुमरे यांच्या हस्ते झाले. या मुख्य शासकीय समारंभात झेंड्यास सलामी दिल्यानंतर शुभेच्छा संदेशात मंत्री भुमरे बोलत होते. खासदार इम्तियाज जलील, आमदार प्रदीप जैस्वाल, विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजित चौधरी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक नीलेश गटणे, विशेष पोलिस महानिरीक्षक के. एम. एम. प्रसन्ना, पोलिस आयुक्त डॉ. निखील गुप्ता, सर्व विभागांचे प्रमुख, वरिष्ठ अधिकारी, नागरिक उपस्थित होते.

मंत्री भुमरे म्हणाले, सामूहिक प्रयत्नांनी चांगल्या आरोग्य सुविधा उभ्या करून कोरोना सारख्या विषाणूला नियंत्रणात आणण्यात यश मिळाले. संभाव्य लाटेचा धोका टाळण्यासाठी अजूनही सतर्क राहणे मात्र आवश्यक आहे. यासाठी प्रत्येकाने लसचे डोस पूर्ण करावेत.
प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजनेअंतर्गत औरंगाबाद राज्यात दुसरा आहे. मतदार यादीत नाव नोंदणीकरीता 1 जानेवारी, 1 एप्रिल, 1 जुलै आणि 1 ऑक्टोबर या चार दिवशी नाव नोंदणी करता येणार आहे. याशिवाय मतदार यादीतील नोंदी प्रमाणीकरणासाठी आणि दुबार नाव नोंदणी टाळण्यासाठी 1 ऑगस्टपासून मतदार ओळखपत्र आधार जोडणीचा कार्यक्रम सुरू झाला आहे.

पैठणच्या संतपीठासाठी 23 कोटी रुपयांच्या निधीचा प्रस्ताव शासनाकडे सादर केला आहे. इको बटालियन व CSR च्या मदतीने गोगाबाबा टेकडी हिरवीगार करण्याचा अनोखा उपक्रम राबविण्यात येतो आहे. शासनाने 2021 मध्ये 66 लाख वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट दिले होते. परंतु जिल्ह्याने तब्बल 85 लाख झाडे लावून त्याचे संगोपन केले. 127 टक्के उद्दिष्ट साध्य करण्यात आपला जिल्हा यशस्वी झाला आहे.

रोजगार हमी योजनेतील कामांबाबत सांगताना ते म्हणाले, सन 2021 22 वर्षात 54 हजार हेक्टर क्षेत्रावर रोहयो अंतर्गत फळबाग लागवड झालेली आहे. शेतकऱ्यांच्या मागणीनुसार ड्रॅगन फ्रुट, शेवगा, केळी व द्राक्षे, इत्यादी पिकांचा समावेश रोजगार हमी योजनेत करण्यात आला. मातोश्री शेत पाणंद रस्ते योजना अंतर्गत राज्यात 25 हजार किलो मीटर रस्त्यांना मान्यता देण्यात आली. पैठण येथे राज्यातील दुसरे सिट्रस इस्टेटला मान्यता देण्यात आली आहे. यामुळे फलोत्पादनास चालना मिळाली आहे. फळबाग योजनेअंतर्गत फळझाडातील अंतरात शिथीलता आणली त्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नांत वाढ झाली, असेही भुमरे म्हणाले.

मुख्य शासकीय समारंभात कार्यक्रमात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल पोलिस अधीक्षक मनीष कलवानिया, पोलिस निरीक्षक व्यंकटेश केंद्रे, संतोष जोशी, पोलिस उपनिरीक्षक कृष्णा हिसवणकर यांचा राष्ट्रपती शौर्य पोलिस पदक प्रदान करत गौरव केला. तर पोलिस उपायुक्त अपर्णा गिते यांना आहरण संवितरण गौरव पुरस्कार, वरिष्ठ पोलिस निरीक्षक संदीप गुरमे यांना आयर्नमॅन हा बहुमान मिळाल्याबद्दल त्यांचाही मंत्री भुमरे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
 

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार