सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

अमेरिकेचे नवनियुक्त वाणिज्यदूत माईक हँकी यांनी घेतली राज्यपालांची भेट

गेल्यावर्षी भारतातून अमेरिकेत उच्च शिक्षणासाठी 62000 विद्यार्थी गेले होते. हे सर्व विद्यार्थी अमेरिकेचे सदिच्छा राजदूत आहेत

Abhimanyu
  • Aug 9 2022 9:18PM
मुंबई : अमेरिकेचे मुंबईतील नवनियुक्त वाणिज्यदूत माईक हँकी यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवन, मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली.

यावेळी माईक हँकी यांनी अमेरिका – भारत द्विपक्षीय संबंध वृद्धिंगत करण्यासाठी आपल्या योजना व प्राधान्यक्रम याबाबत राज्यपालांना माहिती दिली. गेल्यावर्षी भारतातून अमेरिकेत उच्च शिक्षणासाठी 62000 विद्यार्थी गेले होते.  हे सर्व विद्यार्थी अमेरिकेचे सदिच्छा राजदूत आहेत, असे सांगून भारतातून अमेरिकेला जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या पुढील वर्षी  आणखी एक लाखांनी वाढविण्याचे आपले उद्दिष्ट असल्याचे वाणिज्यदूतांनी यावेळी सांगितले.

बैठकीला राजकीय व आर्थिक सल्लागार क्रिस्टॉफर ब्राऊन तसेच अमेरिकेच्या मुंबई वाणिज्यदूतावासातील राजकीय सल्लागार प्रियांका विसारिया – नायक उपस्थित होते.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार