सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

नांदेड जिल्हा परिषदेच्या सि ई ओ पदी वर्षा ठाकूर यांची वर्णी

सि ई ओ पदी वर्षा ठाकूर यांची

Sudarshan MH
  • Sep 24 2020 6:48PM
नांदेड दि.२४(अरविंद जाधव):- नांदेड जिल्हा परिषदेच्या इतिहासात प्रथमच मुख्य कार्यकारी अधिकारी एका महिलेची वर्णी लागली आहे. सीईओ म्हणून सनदी अधिकारी वर्षा ठाकूर यांचे आदेश निर्गमित झाले आहेत.

तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकार अशोक काकडे यांच्या बदलीचे आदेश दि.17 मार्च रोजी निघाले होते.तेव्हापासून पद रिक्त होते.मधल्या काळात अनेक जणांच्या नावांची चर्चा होती.यात सर्वात नाव आघाडी होते, ते वर्षा ठाकूर व शिवानंद टाकसाळे यांचे,
पण आता राज्य सरकारने आज गुरुवार दि.24 रोजी नांदेड जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून वर्षा ठाकूर यांचे आदेश पारित केले आहेत.
नांदेड जिल्हा परिषदेत प्रथम महिला मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून महिला सनदी अधिकारी वर्षा ठाकूर होणार आहेत.विशेष म्हणजे,जिल्हा परिषद अध्यक्ष महिला,जिल्हा परिषद उपाध्यक्ष महिला आता सीईओ म्हणून ही महिलाच आल्या आहेत.त्यामुळे आता जिल्ह्यातील जनतेला महिला राज प्रत्यक्षात बघायला मिळणार आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

0 Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार