सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

भादवडजवळ कार नदीत कोसळली नंदुरबारचे ५ जण गंभीर जखमी

नंदुरबारचे ५ जण गंभीर जखमी

Sudarshan MH
  • Aug 4 2022 7:01AM


विसरवाडी - विसरवाडी - नंदुरबार रस्त्यावर भादवड गावाजवळ मध्यरात्रीच्या सुमारास पुलाचा कठडा तोडून स्विफ्ट डिझायर कार नदीत कोसळल्याची घटना घडली आहे.या अपघातात नंदुरबार येथील ५ जण जखमी झाले आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, विसरवाडी - नंदुरबार रस्त्यावर सुरतेहून नंदुरबार कडे जाणारी स्विफ्ट डिझायर कार भादवड गावाजवळ मध्यरात्री २ वाजेच्या सुमारास पुलाचा कठडा तोडून नदीच्या काठावर कोसळली.सदर अपघाताची माहिती मिळताच आजुबाजुच्या ग्रामस्थांनी अपघातग्रस्तांना तात्काळ मदत करुन कार बाहेर काढून त्यांना नंदुरबार जिल्हा रुग्णालयात दाखल केले.या अपघातात रमेश पाटील,कल्पेश देवरे, अश्विनी देवरे,निलीमा पाटील, अशोक पाटील या पाच जणांसह सहा महिन्याचा मुलगा जखमी झाला आहे.सदर घटनेची माहिती मिळताच विसरवाडी पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक नितीन पाटील यांनी तातडीने पोलिस कर्मचारी यांना घटनास्थळी रवाना करुन अपघातातील जखमींना मदत केली.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार