सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

शिक्षण मंत्र्यांच्या दबावाला बळी पडत अभाविपच्या कार्यकर्त्यांना घेतले ताब्यात (अभाविप द्वारे शिक्षण मंत्र्यांचा तीव्र निषेध)

आज राज्याचे शिक्षण मंत्री मा. उदय सामंत संत गाडगे बाबा

Sudarshan MH
  • Sep 16 2020 10:52AM
आज राज्याचे शिक्षण मंत्री मा. उदय सामंत संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ दौर्‍यावर  होते.अखिल भारतीय विद्यार्थी परिषद,अमरावती महानगर द्वारा काही शैक्षणीक समस्यांना घेऊन 
 १) COVID-19 मुळे रद्द करण्यात आलेल्या परीक्षांचे शुल्क परत करण्यात यावे.
 २) प्रवेश प्रक्रिया शुल्कात शिकवणी शुल्क वगळता बाकी शुल्क माफ करण्यात यावे.उदा.पार्किंग शुल्क,जिमखाना      शुल्क,ग्रंथालय शुल्क,इत्यादी.
 ३) प्रवेश शुल्काच्या ३०% रक्कम हि माफ करण्यात यावी.
 ४) महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना वार्षिक प्रवेश शुल्क भरण्यास किमान ४ टप्पे देण्यात यावे.
  अभाविपच्या शिष्ट मंडळाने भेट घेण्याची वेळ मागीतली होती.त्यासंदर्भात मा.शिक्षण मंत्र्यांशी दोन ते तीन वेळा    संपर्क  सुद्धा करण्यात आला होता.परंतू या सगळ्या गोष्टिंकडे दुर्लक्ष करत विद्यार्थ्यांच्या भेटी नकारत दडपशाही ची  भुमीका घेत निवेदन तर नाहीच परंतू अभाविपच्या कार्यकर्त्यांना कुठल्याही प्रकारची माहिती न देता पोलीसांद्वारे  कार्यकर्त्यांच्या घरी जाऊन ताब्यात घेण्यात आले. अभाविप या घटनेचा तीव्र निषेध करते.
               अभाविपच्या कार्यकर्त्यांनी शैक्षणीक मागण्यांना घेऊन लोकशाहीच्या मार्गाने व समन्वयातून चर्चा करण्यासाठी वेळ मागीतली होती या मध्ये दुर्लक्षतेच्या भावनेने व हुकूमशाही गाजवत पोलीसांद्वारे केलेली कार्यवाही म्हणजे महाराष्ट्र शासन व शिक्षणमंत्री यांचा समस्यांपासून दुर जाण्याचा पळपुटेपणा दिसून येतो. असे वक्तव्य प्रदेशमंत्री रवी दांडगे यांनी केले.
         (हे प्रसिद्धी पत्रक विदर्भ प्रांत कार्यालय मंत्री दुर्गेश साठवणे यांनी प्रसिद्धीस दिले आहे.)

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

0 Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार