सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

कोल्हापूर अंबाबाई मंदिरात दर्शनासाठी नियमावली तयार

#Mahasagar Live News कोल्हापूर अंबाबाई मंदिरात दर्शनासाठी नियमावली तयार, राज्य शासनाच्या परवानगी नंतर मंदिर सुरू करणार

Snehal Joshi .
  • Sep 15 2020 11:47AM
कोल्हापूर:- अनलाॅक अंतर्गत राज्यातील मंदिरे लवकरच भविकांसाठी खुली होण्याचे संकेत दिसू लागले आहेत. याच पार्श्वभूमीवर साडेतीन पीठापैकी एक पूर्ण पीठ असलेल्या कोल्हापूरातील श्री. अंबाबाई मंदिरात देवीच्या दर्शनासाठी नियमावली तयार करण्यात आली आहे. या नियमावलीत राहूनच भक्तांना देवीचे दर्शन मिळणार आहे. मंदिर खुले झाले तरी मंदिराच्या चारही दरवाजातून ये-जा करता येणार नाही. भक्तांसाठी केवळ एकच दरवाजा खुला ठेवला जाईल. भक्तांच्या संख्येवरही मर्यादा असेल, त्यासाठी शासनाने घातलेल्या सर्व अटी नियमांचे पालन केले जाईल.मात्र राज्य शासनाने परवानगी दिल्यानंतर मंदिर सुरू करण्यात येईल असे पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती अध्यक्ष महेश जाधव यांनी सांगितले. दर्शनासाठी मंदिरात प्रवेश करणाऱ्या भक्तांना मास्कची सक्ती असेल. आत प्रवेश करणाऱ्या सर्वांचे थर्मल टेस्टिंग होईल. सॅनिटायझरचा वापर केला जाईल. मंदिरात पूजेसाठी घेऊन जाणाऱ्या खण, ओटी साहीत्यावरही निर्बंध असतील. कोविड रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता, सुरुवातीचे काही दिवस भक्तांना थेट गाभाऱ्यात प्रवेश न देता पितळी उंबऱ्यापासून दर्शन देण्याचाही देवस्थान समितीचा विचार सुरू आहे. देशातील अन्य राज्यांप्रमाणे महाराष्ट्रातील मंदिरे दर्शनासाठी लवकरच खुली होतील, अशी आशा सर्वसामान्य भक्ताला लागून राहिली आहे. पण, मंदिरे खुली झाली तरी भक्तांना सहज देवदर्शन होणे कठिण आहे. शासन आणि मंदिर व्यवस्थापनाच्या काटेकोर नियमांचे पालन करुनच देवदर्शन घ्यावे लागणार आहे. कोरोना रुग्णांची वाढणारी संख्या आणि राज्यात सुरु असलेली बिकट परिस्थिती यामुळे महाराष्ट्र शासनाने अद्याप मंदिरे अनलाॅक केलेली नाहीत. पण मुंबईत नुकत्याच झालेल्या कोविड टास्क फोर्स बैठकीत येत्या तीन ते चार दिवसात मर्यादित क्षमतेने मंदिर आणि रेस्टॉरंट सुरू करण्यावर चर्चा झाली आहे. त्यामुळे राज्यातील मंदिरे लवकरच अनलाॅक होतील असे संकेत आहेत. #MAHARASHTRA #TEMPLE #AMBABAI #mahasagarlivenews

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार