सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

भरधाव एसटी बसच्या धडकेत नंदुरबारयेथील दुचाकीस्वार ठार

एसटी बसच्या धडकेत नंदुरबारयेथील दुचाकीस्वार ठार

Nandurbar. MH
  • Jun 22 2022 3:13PM
 

नंदुरबार - नंदुरबार -दोंडाईचा रस्त्यावर चौपाळे गावाच्या फाट्याजवळ मंगळवारी सकाळी ११ वाजता भरधाव एसटी बसने एक्टिवा दुचाकीला जोराची धडक दिली.या अपघातात नंदुरबार येथील एक जण ठार झाला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, दुचाकीस्वार कृष्णा भिमाजी गवळी (३१,रा.शक्तीसागर गणेश मंडळ जवळ, नंदुरबार) हे दि.२१ जुन रोजी मंगळवारी सकाळी ११.५० वाजता आपल्या एक्टिवा दुचाकीने नंदुरबार -दोंडाईचा रस्त्याने जात असताना चौपाळे गावाच्या फाट्याजवळ भरधाव वेगाने येणाऱ्या एसटी बसने एक्टिवा दुचाकीला जोराची धडक दिली.या अपघातात गंभीर दुखापती झाल्याने त्यांना नंदुरबार येथे खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता दुपारी दोन वाजता त्यांचे निधन झाले.याप्रकरणी बसचालक रशीद खाँ मुनाफखा (रा.निजामपूर) यांच्या विरोधात नंदुरबार शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.गणेश गवळी हे मनमिळावू स्वभावाचे होते.ते मयुर दुध डेअरीचे संचालक होते.माजी नगरसेवक लक्ष्मण गवळी यांचे बंधू होते.त्यांच्या पश्चात पत्नी, वडील, ६ भाऊ,३ मुले,पुतणे असा परिवार आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार