सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

लालबारी गावाच्या रेल्वे रुळाजवळ शिक्षकांचा मृतदेह मिळाल्याने खळबळ

शिक्षकांचा मृतदेह मिळाल्याने खळबळ

Sudarshan MH
  • Jun 21 2022 4:38PM

नवापूर -लालबारी गावाजवळ रेल्वे रुळालगत खेकडा प्राथमिक शाळेतील शिक्षकांच्या मृतदेह मिळाल्याने एकच खळबळ उडाली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, नवापूर शहरातील मानला सोसायटी येथे राहणारे प्राथमिक शिक्षक महेश देवीदास बाविस्कर (४८) यांचा मृतदेह दि.२० जुन रोजी सोमवारी लालबारी गावाच्या रेल्वे रुळाजवळ मिळुन आला.त्यांच्या डोक्यावर गंभीर दुखापत झाल्याने ते रक्तबंबाळ अवस्थेत मिळून आले.सदर शिक्षकांचा मृत्यू नेमका कशाने झाला हे कळु शकलेले नाही. सदर घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक बाळासाहेब भापकर यांनी हवालदार विकास पाटील, युवराज परदेशी यांना तातडीने पाठवले.पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी नवापूर उप जिल्हा रुग्णालयात रवाना केला.सदर घटनास्थळी नवापूर शहरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार