सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

१४ कोटींच्या कामांची निविदा रद्द केल्याने भाजप नगरसेवकांनी केला जाहीर निषेध

भाजप नगरसेवकांनी केला जाहीर निषेध

Nandurbar. MH
  • Jun 21 2022 11:37AM

नंदुरबार- १४ कोटी रुपयांचा विकास कामांची निविदा रद्द केल्याचा कारणावरून भाजपच्या नगरसेवकांनी नगरपालिकेच्या सभागृहात गदारोळ केला. विरोधकांनी सत्ताधाऱ्यांचा निषेध करत निषेधाचे बॅनर झळकावले.

नंदुरबार नगर पालिकेची सर्वसाधारण सभा दि. २० जुन रोजी सोमवारी  प्रभारी नगराध्यक्ष कुणाल वसावे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.यावेळी १४ कोटी रुपयांचा विकास कामांची निविदा रद्द केल्याचा मुद्दा भाजपा नगरसेवकांनी उचलून धरला.यावेळी सत्ताधारी व विरोधी नगरसेवक यांच्यात खडाजंगी झाली. भाजप नगरसेवक चारुदत्त कळवणकर,आनंद माळी, प्रशांत चौधरी, निलेश पाडवी आदि नगरसेवकांनी जाहीर निषेधाचे बॅनर झळकावून सत्ताधाऱ्यांचा निषेध केला.निविदा रद्द करण्यात आल्याने शहरातील विकास कामे थांबतील,असा आरोप केला.यावेळी विरोधी नगरसेवकांनी नगराध्यक्ष यांना निवेदन दिले.
सर्व साधारण सभेत एकूण ९ विषयावर चर्चा करून मंजुरी देण्यात आली.सभेत नंदुरबार शहराची हद्द वाढल्याने नागरिकांच्या मागणीनुसार २०० विद्युत पोल व साहित्य खरेदी करण्यासाठी मंजुरी देण्यात आली. स्मशान भूमी साठी लाकूड व गोवऱ्या खरेदी करणे, आदिवासी वस्ती सुधारणा योजनेतून नवीन पथदिवे बसविणे,मयत कर्मचारी यांच्या वारसांना अनुकंपा तत्त्वावर सामावून घेणे, आदि.विषयांना मंजुरी देण्यात आली. याप्रसंगी मुख्याधिकारी अमोल बागुल, वैशाली जगताप, जयसिंग गावीत, संजय माळी, दिपक पाटील आदी उपस्थित होते.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार