सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

शहादा येथे सव्वा नऊ लाखांचे सोने घेऊन बंगाली कारागीर पसार

३ जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा

Sudarshan MH
  • Jun 20 2022 6:18AMशहादा-  शहरातील एका संराफाचे ९ लाख २७ हजार ६६५ रुपये किंमतीचे सोने चोरी करून बंगाली कारागीर पसार झाल्याची घटना घडली आहे.याप्रकरणी ३ जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, शहादा शहरातील ज्वेलर्स संजय रमेशचंद्र सोनार ( रा.सोनार गल्ली) यांच्या टिळक चौकातील सोन्याचे दागिने निर्मितीच्या कारखान्यात काम करणाऱ्या सबुर अन्सार मलीक (दिलीरपार ईस्ट,मुपो.पंडुआ,प.बंगाल), प्रसंथासाहू गोपाल साहू ( रा.किस्मखंज्यापूर,जि.मेदीनीपूर.प.बंगाल) ,सौरव जाना ( रा.बारासात,हुगली,प.बंगाल) या तिघांना सोन्याचे दागिने घडविण्यासाठी संजय सोनार यांनी ९ लाख २७ हजार रुपये किंमतीचे १८५.५३३ ग्राम वजनाचे सोन्याची दगड दिली होती.सदर सोन्याचे दागिने न बनविता तिघे कारागीर सोने चोरी करून पळून गेले.सदर घटना दि.२० जानेवारी ते १८ जुन दरम्यान सकाळी ११ वाजता घडली.याप्रकरणी वरील आरोपींविरुद्ध शहादा पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तपास सपोनि गणेश पवार करीत आहेत.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार