सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

उंदीर आणि बेडकाने घेतला तिघांचा बळी.पोळ्याच्या दिवशी अखेर विहिरीत पडलेला उंदीर ठरला त्या तीन जणांचा काळ ;

दुपारी जेवण केल्यानंतर पाणी पिण्याकरिता शेतातील विहिरीजवळ गेले.

Snehal Joshi .
  • Aug 20 2020 10:17AM
मौदा तहसील येथील अरोली पोलिस ठाण्यांतर्गत वाकेश्‍वर येथील तीन शेतमजुरांचा विहिरीत पडलेले उंदीर आणि बेडकांना बाहेर काढण्याचा प्रयत्नात मृत्यू झाला. बुधवारी दुपारी दीड वाजताच्या सुमारास ही घटना घडली. वाकेश्‍वर निवासी आकाश भोजराज पंचबुद्धे वय (२७), विनोद प्रभू बर्वे वय(३७) आणि गणेश मुन्नीलाल काळबांडे वय (२८) हे दुपारी जेवण केल्यानंतर पाणी पिण्याकरिता शेतातील विहिरीजवळ गेले. विहिरीत काही उंदीर व बेडूक त्यांना दिसून आले. तिघेही मजूर बद्रीनारायण नेहरू सपाटे यांच्या धानाच्या शेतात सल्फेट मारण्यासाठी गेले होते. विहिरीत एक उंदीर व बेडूक त्यांना दिसून आला. ते काढण्यासाठी एक मजूर हा विहिरीच्या लोखंडी अँगलच्या आधारे विहिरीत उतरला. परंतु, तो बाहेर येत नसल्याने दुसरा तर दोघांना काढण्यासाठी तिसरा मजूर विहिरीत उतरला. विहिरीत विषारी गॅस असल्यामुळे तिघांचा दम कोंडून मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे. पोलिस निरीक्षक विवेक सोनवणे यांनी सांगितले की, तिघांच्या शरीरावर कुठल्याही जखमांचे निशाण नव्हते. अरोली पोलिस विवेक सोनवणे, पोलिस उपनिरीक्षक ऋषिकेश चाबुकस्वार हे आपल्या सहकार्‍यांसोबत घटनास्थळी पोहोचले. पोळ्याच्या दिवशी अखेर विहिरीत पडलेला उंदीर त्या तीन जणांचा काळ ठरला वाकेश्र्वर येथील थरकाप सोडणारी घटना घडल्याने परसरात हळ हळ व्यक्त होत आहे. 

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

0 Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार