सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

40 हजार विद्युत बिलामुळे दिला जीव.

नागपूरमध्ये लॉकडाऊनमधील केवळ घरगुती वापराचं वीज बिल चक्क 40 हजार रुपये आलेल्या व्यक्तीने स्वतःला जाळून घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली.

Snehal Joshi .
  • Aug 10 2020 11:16PM
लॉकडाऊनच्या काळात प्रत्यक्ष वीज मीटर रिडिंग न घेता अंदाजे काढण्यात आलेल्या वीज बिलांचा झटका अनेक राजनेते, अभिनेते नागरिकांना बसला. ते बिल कमी करण्यासाठी अनेक नागरिकांना वीज महामंडळाच्या कार्यालयाच्या (एमएससीबी) प्रदक्षणा माराव्या लागल्या. भाजप तर्फे आंदोलन ही छेडण्यात आले मात्र, नागपूरमध्ये लॉकडाऊनमधील केवळ घरगुती वापराचं वीज बिल चक्क 40 हजार रुपये आलेल्या व्यक्तीने स्वतःला जाळून घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. लीलाधर गायधने असं या मृतक व्यक्तीचं नाव आहे. वारंवार महावितरणच्या कार्यालयात हेलपाटे मारुनही दिलासा न मिळाल्याने गायधने यांनी आत्महत्या केल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबियांनी केला आहे. लीलाधर गायधने हे एका खासगी ठिकाणी सुरक्षा रक्षक म्हणून काम करत होते. लॉकडाऊनमध्ये आर्थिक उत्पन्नाची साधनं बंद झाली. त्यातच घरगुती वापराचं वीज बिल थेट 40 हजार रुपये आल्याने गायधने यांना धक्का बसला. त्यांच्या घरात कोणत्याही सामान्य घरात असावे इतकेच बल्ब आणि फॅन आहेत. मात्र, त्याचं बिल थेट 40 हजार आल्याने लीलाधर गायधने बरेच दिवस मानसिक तणावात होते. गायधने यांनी हे वीज बिल कमी करण्यासाठी वीज महामंडळाच्या कार्यालयात अनेकदा हेलपाट्या घातल्या. मात्र, तेथे त्यांना कोणताही दिलासा मिळाला नाही. उलट बिल न भरल्यास घरातील वीजही खंडीत होण्याची भीती त्यांच्या मनात निर्माण झाली. अखेर त्यांनी स्वतःला रॉकेल घालून जाळून घेत आत्महत्या केली, अशी माहिती गायधने यांच्या कुटुंबानी दिली. गायधने कुटुंबाने सांगितलं, “लॉकडाऊनमध्ये आम्हाला घराचं वीज बिल 40 हजार रुपये आलं. इतकं बिल भरणं आम्हाला शक्य नव्हतं. आर्थिक परिस्थिती नसल्याने आम्ही हे वीज बिल कमी करण्यासाठी अनेकदा प्रयत्न केले. मात्र, कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. काही काळाने घरातील वीजही खंडीत होण्याची भिती निर्माण झाली. त्यातूनच त्यांनी स्वतःला जाळून घेत आत्महत्या केली.” या घटनेची यशोधानगर पोलीस स्टेशनमध्ये नोंद करण्यात आली आहे. तर ही वाढीव विद्युत बिलासाठी केलेली आत्महत्या करण्याचा ची घटना हे खुद्द विद्युत मंत्री नितीन राऊत यांच्या घरापासून अगदी 5 किलोमीटरच्या आत घडली आहे. 

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार