सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

‘श्रीकृष्ण जन्माष्टमी’ची पूजा घरी भक्तीभावाने कशी करावी ?--सनातन संस्था

‘कोरोना’ विषाणूच्या संकटामुळे एकत्र येऊन उत्सव साजरा करण्यास मर्यादा येत असल्याने ‘श्रीकृष्ण जन्माष्टमी’ची पूजा घरी भक्तीभावाने कशी करावी ?

सौजन्य : सनातन संस्था
  • Aug 10 2020 7:19PM
प्रतिवर्षी भारतामध्ये मंदिरे , धार्मिक संस्था येथे श्रीकृष्णजन्माष्टमीचा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. उत्सव साजरा करतांना प्रांता-प्रांतानुसार उत्सव साजरा करण्याच्या पद्धती वेगवेगळ्या असतात. उत्सवाच्या निमित्ताने बरेच लोक एकत्र येऊन भक्तीभावाने हा उत्सव साजरा करतात. या वर्षी कोरोना विषाणूंच्या संकटामुळे दळणवळण बंदी असल्याने घराबाहेर पडण्यावर अनेक बंधने आहेत. कोरोना सारख्या आपत्वाळाच्या पार्श्‍वभूमीवर एकत्र येऊन हा उत्सव साजरा करण्यावर मर्यादा आल्या आहेत. कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव झाल्याने जेथे दळणवळण बंदी ( लॉकडाऊन) आहे तेथे एकत्र येऊन पूजा करणे शक्य होणार नाही. परंतु जेथे कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव अल्प असल्याने दळणवळण बंदीचे नियम काही प्रमाणात शिथिल करण्यात आले. तेथे शासनाने कोरोना संदर्भात सांगितलेल्या मार्गदर्शक सूत्रांचे पालन करून कमी लोकांमध्ये हा जन्मोत्सव साजरा करावा. त्यामुळे एकत्र न येताही आपापल्या घरीच श्रीकृष्णजन्माष्टमीची पूजा कशी करता येईल त्याचा या लेखात प्रामुख्याने विचार केला आहे. हिंदु धर्माने सांगितलेल्या ‘आपद्धर्मा’चा भाग म्हणून लेखात विवेचन करण्यात आले आहे. ‘प्रती वर्षी अनेक ठिकाणी ‘श्रीकृष्ण जन्माष्टमी’चा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. या वर्षी 11.8.2020 या दिवशी ‘श्रीकृष्ण जन्माष्टमी’ आहे. 1. श्रीकृष्णाच्या पूजनाचा काळ : श्रीकृष्णाच्या जन्माची वेळ रात्री १२ वाजता असते. त्यामुळे त्यापूर्वी पूजनाची सिद्धता करून ठेवावी. रात्री १२ वाजता शक्य असल्यास श्रीकृष्णजन्माचा पाळणा (गीत) लावावा. (श्रीकृष्णजन्माचा पाळणा शेवटी दिलेल्या ‘लिंक’वर उपलब्ध आहे.) 2. श्रीकृष्णाचे पूजन 2 अ. श्रीकृष्णजन्माचा पाळणा झाल्यानंतर श्रीकृष्णाची मूर्ती अथवा चित्र यांची पूजा करावी. 2 आ. षोडशोपचार पूजन : ज्यांना श्रीकृष्णाची ‘षोडशोपचार पूजा’ करणे शक्य आहे, त्यांनी तशी पूजा करावी. 2 इ. पंचोपचार पूजन : ज्यांना श्रीकृष्णाची ‘षोडशोपचार पूजा’ करणे शक्य नाही, त्यांनी ‘पंचोपचार पूजा’ करावी. पूजन करतांना ‘सपरिवाराय श्रीकृष्णाय नमः ।’ हा नाममंत्र म्हणत एक एक उपचार श्रीकृष्णाला अर्पण करावा. श्रीकृष्णाला दही-पोहे आणि लोणी यांचा नैवेद्य दाखवावा. त्यानंतर श्रीकृष्णाची आरती करावी. (पंचोपचार पूजा : गंध, हळद-कुंकू, पुष्प, धूप, दीप आणि नैवेद्य या क्रमाने पूजा करणे.) 3. श्रीकृष्णाची मानसपूजा जे काही कारणास्तव श्रीकृष्णाची प्रत्यक्ष पूजा करू शकत नाहीत, त्यांनी श्रीकृष्णाची ‘मानसपूजा’ करावी. (‘मानसपूजा’ याचा अर्थ प्रत्यक्ष पूजा करणे शक्य नसल्यास पूजनाचे सर्व उपचार मानसरित्या (मनाने) श्रीकृष्णाला अर्पण करणे.) 4. पूजनानंतर नामजप करणे पूजन झाल्यानंतर काही वेळ श्रीकृष्णाचा ‘ॐ ॐ नमो भगवते वासुदेवाय नमः ॐ ॐ ।’ हा नामजप करावा. 5. ‘अर्जुनाप्रमाणे निस्सीम भक्ती निर्माण व्हावी’, यासाठी श्रीकृष्णाला मनोभावे प्रार्थना करणे यानंतर श्रीकृष्णाने श्रीमद्भगवद्गीतेमध्ये दिलेल्या ‘न मे भक्तः प्रणश्यति ।’ म्हणजे ‘माझ्या भक्ताचा नाश होत नाही.’ या वचनाचे स्मरण करून आपल्यामध्ये ‘अर्जुनाप्रमाणे निस्सीम भक्ती निर्माण व्हावी’, यासाठी श्रीकृष्णाला मनोभावे प्रार्थना करावी.’ ज्यांना ‘श्रीकृष्णजन्माष्टमीची पूजा कशी करावी ?’, याविषयी सविस्तर माहिती हवी असेल, त्यांनी ‘सनातन संस्थे’च्या संकेतस्थळावरील पुढे दिलेल्या ‘लिंक’ला आवश्य भेट द्यावी. https://www.sanatan.org/mr/krushna

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार