सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

शहरात नांदतंय वीज चोरांचे 'गोकूळ'; ओले हात करणाऱ्यांची चाललीय धुम'धाम'

नंदुरबार - शहरालगतच्या एका नवीन वसाहतीत चक्क आकडे टाकून मोठ्या प्रमाणात वीज वापरली जात असल्याचे आज उघडकीस आले.

Nandurbar MH
  • Nov 24 2021 9:20PM

नंदुरबार - शहरालगतच्या एका नवीन वसाहतीत चक्क आकडे टाकून मोठ्या प्रमाणात वीज वापरली जात असल्याचे आज उघडकीस आले. वीज चोरांचे हे 'गोकुळ' कोणाच्या आशीर्वादाने धूम'धाम' करीत आहे ? असा प्रश्न यामुळे चर्चेत आला. शासकीय रेकॉर्डवर अद्याप त्याची मात्र नोंद झालेली नाही. मागील दीड ते दोन वर्षांपासून लाखो रुपयांची ही वीज चोरी चालू असल्याचे समजते.
अधिक माहिती अशी की, नंदुरबार शहराबाहेरून जाणाऱ्या शहादा वळणरस्त्यावरील उड्डाणपुला लागत एक हाउसिंग सोसायटी काही वर्षापासून उभारण्यात आली आहे. शहरातील काही सामान्य आणि काही नामांकित लोकांनी तिथे घरे घेतली आहेत. परंतु अधिकृत मिटर तिथे प्राप्त झालेले नाही असे समजते. अधिकृत वीज वापरा ऐवजी चक्क ग्रामीण लोकांप्रमाणे आकडे टाकून वीज चोरी चालू असल्याचे लोकांना निदर्शनास आले आहे. म्हणून काही जणांनी वीज वितरण कंपनीच्या कार्यालयात तक्रारीदेखील दिल्या आहेत. वीज चोरांच्या या 'गोकुळा'ची दखल घेण्याऐवजी संबंधित अधिकारी ओले हात करून धुम'धाम' करीत होते, अशी चर्चा आहे. तथापि काल 23 नोव्हेंबर रोजी काही वीज कर्मचारी व अधिकारी यांनी तक्रारीची दखल घेऊन अचानक तपासणी केली तेव्हा अनेक ठिकाणी आकडे टाकलेले पाहायला मिळाले. परंतु त्याविषयी कोणताही गुन्हा किंवा नोंद अधिकृतपणे न करता चिरी मिरी चा प्रकार घडवून प्रकरण दडपण्यात आल्याचे सुदर्शन न्युज च्या विश्वसनीय सूत्र नुसार समजले आहे , सदर प्रकरणाची दखल वरिष्ठांनी घेऊन योग्य ती कार्यवाही करणे जनतेला अपेक्षित आहे
सुदर्शन न्युज
केतन रघुवंशी

नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी - केतन रघुवंशी  मो. 8421732333 / 9637732333

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार