सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा केला खून ; पती पोलिसांच्या ताब्यात

म्हसावद : चारित्र्याचा संशय घेत पत्नीला दगडाने वार करून ठार केल्याची घटना अक्कडकोट ता. शहादा येथे घडली.

Nandurbar MH
  • Nov 24 2021 3:53PM


म्हसावद : चारित्र्याचा संशय घेत पत्नीला दगडाने वार करून ठार केल्याची घटना अक्कडकोट ता. शहादा येथे घडली. संशयित पतीचे नाव रवींद्र ठोबा पावरा (४३) रा. अक्कडकोट ता. शहादा. तर मंगीबाई रवींद्र पावरा (४०) असे मयत महिलेचे नाव आहे. पोलिसांच्या सूत्रानुसार रवींद्र ठोबा पावरा हा नेहमीच त्याची पत्नी मंगीबाई पावरा तिच्यावर चारित्र्याचा संशय घेत असायचा. रवींद्र हा मंगीबाई हिला लक्कडकोट ते तलावडी रस्त्यावर चिरडे शिवारातील चिंध्या तुंबड्या पावरा यांच्या कपाशीच्या शेतात घेवून गेला. तिथे त्याने पत्नीवर चारित्र्याचा संशय घेवून मारहाण केली. तिचा गळा दाबून, हाताच्या बुक्क्यांनी, अणुकूचीदार दगडाने डोक्यावर, कपाळावर, डाव्या डोळ्यावर गंभीर जखमा करून जीवे ठार मारले. खुनाचा पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने मृतदेह त्याच कपाशीच्या शेतात खड्डा करून पुरून दिला.
पोलीस पाटील सखाराम शंकर पावरा यांनी फिर्याद दिल्यानुसार म्हसावद पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मयत मंगीबाई पावरा हिला चार मुली, एक मुलगा आहे. संशयीतास पोलिसांनी रात्रीतूनच अटक केली असून पोलीस निरीक्षक निवृत्ती पवार पुढील तपास करीत आहे.

नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी - केतन रघुवंशी  मो. 8421732333 / 9637732333

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार