सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

अंगारकी चतुर्थीला दिवेआगरच्या सुवर्ण गणेशाची पुनर्स्थापना

दिवेआगरच्या गणेशभक्तामध्ये आनंदाचे वातावरण आहे.

Sudarshan MH
  • Nov 23 2021 11:45AM

मंगळवारी अंगारकी चतुर्थीचे औचित्य साधून दिवेआगर येथील मंदिरात सुवर्ण गणेशाची पुनर्स्थापना करण्यात आली. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते नव्याने घडविण्यात आलेल्या सुवर्ण गणेशाच्या मुखवट्याची मंदिरात ही प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. त्यामुळे दिवेआगरच्या गणेशभक्तामध्ये आनंदाचे वातावरण आहे.

२३ मार्च २०१२ रोजी दरोडेखोरांनी दोघा सुरक्षा रक्षकांचा खून करून दिवेआगरच्या मंदिरातील हा सुवर्ण गणेशाचा मुखवटा व दागिने मिळून १ किलो ६०० ग्राम सोने पळवून नेले होते. त्यानंतर पोलिसांनी तपास करून दरोडेखोरांना ताब्यात घेतले त्यांच्याकडून वितळलेल्या मुखवट्याचे १ किलो ३५१ ग्राम सोने लगडीच्या स्वरूपात हस्तगत केले होते. जिल्हा न्यायालयाने आरोपींना शिक्षा सुनावली. पण सुवर्ण गणेश मुखवट्याच्या स्वरूपात न राहिल्याने सोने परत करण्यास खालच्या न्यायालयाने नकार दिला होता. त्यातच आरोपींनी उच्‍च न्‍यायालयात अपील केल्यामुळे हे सोने परत मिळवण्यात अडचणी येत होत्या. हे सोने परत मिळावे यासाठी रायगड जिल्हा प्रशासनाच्या वतीने उच्‍च न्‍यायालयात अर्ज करण्यात आला होता. त्यावरील सुनावणी अंती हे सोने पुन्हा राज्य सरकारला द्यावे, असे निर्देश मार्च अखेरीस न्यायालयाने दिले होते

यानंतर मुखवटा तयार करण्‍याची कार्यपदधती शासनस्‍तरावर निश्चित करावी यासाठी पालकमंत्री आदिती तटकरे प्रयत्‍न केले. त्‍यानुसार मुंबईत गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्‍या उपस्थितीत बैठक पार पडली. उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार मुद्देमालापासून सुवर्ण गणेशाच्या आधीच्या मुखवट्याप्रमाणेच नवीन मुखवटा तयार करुन त्याची प्रतिष्ठापना करण्यात यावी. लोक भावना विचारात घेऊन सुवर्ण गणेश प्रतिष्ठापना करण्याची कार्यवाही जिल्हा प्रशासन व दिवेआगर सुवर्ण गणेश मंदिर ट्रस्ट यांनी समन्वयाने करावी, असे निर्देश गृह मंत्री  दिलीप वळसे-पाटील यांनी संबंधितांना दिले होते.

यानंतर निविदा प्रक्रीया पुर्ण करून पु ना गाडगीळ ज्वेलर्सला सुवर्ण गणेशाचा नव्याने मुखवटा तयार करण्याचे काम देण्यात आले आहे. यानंतर येत्या २३ नोव्हेंबरला अंगारकी चतुर्थीचे औचित्य साधून सुवर्ण गणेशाच्या मुखवट्यांची गणेश मंदिरात नव्याने पुनर्स्थापना करण्यात आली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यावेळी होते. गेली नऊ वर्षांनंतर सुवर्ण गणेशाची नव्याने बांधण्यात आलेल्या मंदिरात पुनर्स्थापना होणार आहे. त्यामुळे गणेशभक्तांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

कुठे सापडला सुवर्ण गणेश

२० वर्षांपूर्वी म्‍हणजे १७ नोव्हेंबर १९९७ रोजी दिवेआगर येथील द्रौपदी धर्मा पाटील यांच्या बागेत झाडांची आळी करताना एक तांब्याची पेटी मिळाली. गावचे सरपंच, प्रतिष्ठित मंडळी, पोलिस अशा सर्वांसमक्ष पेटीचे कुलूप तोडण्यात आले. आत गणपतीचा शुद्ध सोन्याचा मुखवटा सापडला. बरोबर एक तांब्याचा डबाही होता. त्यात १ किलो ३०० ग्रॅम वजनाचा मुखवटा व २८० ग्रॅम वजनाचे गणपतीचे अलंकार होते. गणेश मुखवटयासह दागिने गावातील मंदिरात स्‍थानिक ट्रस्‍टच्‍या देखरेखीखाली ठेवण्‍यात आले होते.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार