सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

पठाणकोट हल्ल्याच्या सहा वर्षांपूर्वीच्या जखमा ताज्या असताना पुन्हा एकदा ग्रेनेड हल्ला

पठाणकोटमध्ये (Pathankot) धीरा पुलाजवळ सैन्यदलाच्या एका छावणीजवळ असलेल्या त्रिवेणी द्वार गेटवर सोमवारी रात्री ग्रेनड हल्ला (Grenade blast) झाला. अज्ञात आरोपी हे दुचाकीवरुन आले होते.

Sudarshan MH
  • Nov 22 2021 12:17PM

पंजाबच्या (Punjab) पठाणकोट (Pathankot) येथून एक वाईट बातमी समोर आली आहे. पठाणकोट येथे भारतीय सैन्याच्या कॅम्पजवळ (Indian Army camp) सोमवारी रात्री ग्रेनेड हल्ला (Grenade blast) झाल्याची माहिती समोर आली आहे. पण सुदैवाने या हल्ल्यात कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही. या हल्ल्यामुळे भारतीय सैन्य आणि पंजाब पोलीस (Punjab Police) अलर्ट (Alert) झाले आहेत. तसेच या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पठाणकोट एअरफोर्स स्टेशन आणि सैन्यदलाच्या इतर छावण्या असलेल्या परिसरात अधिकचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पठाणकोटमध्ये धीरा पुलाजवळ सैन्यदलाच्या एका छावणीजवळ असलेल्या त्रिवेणी द्वार गेटवर सोमवारी रात्री ग्रेनड हल्ला झाला. अज्ञात आरोपी हे दुचाकीवरुन आले होते. त्यांनीच हा ग्रेनेड हल्ला केल्याचा प्राथमिक अंदाज बांधला जातोय. पण याबाबत अद्याप खात्रीशीर माहिती समोर आलेली नाही. पंजाब पोलीस या प्रकरणाचा तपास युद्ध पातळीवर करत आहेत. पंजाब पोलीस संबंधित परिसरातील तसेच आजूबाजूच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत. तसेच घटनेनंतर लगेच पंजाबच्या सर्व पोलीस ठाण्यांमध्ये हायअलर्टचा मेसेज जारी करण्यात आला आहे

पोलिसांना घटनास्थळी ग्रेनेडचे काही तुकडे सापडले आहेत. घटनास्थळी तपासासाठी दाखल झालेले पठाणकोटचे एसएसपी सुरेंद्र लांबा यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. "आम्ही जेव्हा इथे पोहोचलो तेव्हा प्राथमिक दृष्ट्या इथे ग्रेनेड हल्ला झाल्याचं निदर्शनास आलं. याबाबत सध्या तपास सुरु आहे. घटनेच्या वेळी या भागातून एक दुचाकी गेलीय. आम्ही सीसीटीव्हीच्या आधारे देखील तपास करत आहोत. तपासादरम्यान आम्हाला सीसीटीव्हीत चांगले पुरावे मिळतील अशी आशा आहे", अशी प्रतिक्रिया पोलीस अधिकारी सुरेंद्र लांबा यांनी दिली.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार