सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

जागतिक आदिवासी दिवस घरातच साजरा करा आदिवासी महासंघासह विविध संघटनांचे आवाहन

जागतिक आदिवासी दिवस घरातच साजरा करा

Sudarshan MH
  • Aug 6 2020 4:54PM
सुदर्शन न्युज : नंदुरबार - कोरोनाचा जिल्ह्यात होत असलेला प्रसार लक्षात घेऊन यंदाचा जागतिक आदिवासी दिवस कोणत्याही मिरवणुका न काढता व कोणतेही कार्यक्रम न घेता अत्यंत साध्या पद्धतीने साजरा करावा. आपापल्या घरी आदिवासी महापरुषांचे प्रतिमापूजन करावे. तसेच दारावर आंब्याच्या पानांचे तोरण बांधावे, संध्याकाळी दिवे लावावे, असेही आवाहन केले आहे.
 अखिल भारतीय आदिवासी महासंघासह सर्व आदिवासी जनसंघटनांनी हा निर्णय घेतला आहे. आपापल्या गांवी साध्या पद्धतीने वृक्षारोपण, रक्तदान शिबीर व समाज व विद्यार्थी हिताचे कार्यक्रम शारीरिक अंतर ठेवण्याचे नियम पाळून साजरे करावे,  असे बैठकीत ठरले आहे. अशी माहिती अखिल भारतीय आदिवासी महासंघाचे अध्यक्ष डॉ. भरत वळवी, सचिव बटेसिंग वसावे, विधी सल्लागार अॅड. भगतसिंग पाडवी यांनी दिली. ही माहिती देतांना त्यांनी म्हटले आहे की, जिल्हा पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्यासमवेत नंदुरबार शहरातील जनसंघटनांच्या झालेल्या बैठकीत विविध जनसंघटनांनी हा निर्णय घेतला. मध्य प्रदेश, गुजरात आणि महाराष्ट्र या तीन राज्यांच्या सीमेवरील जिल्हा असल्यामुळे आणि बहुसंख्येने आदिवासी असल्यामुळे दरवर्षी जागतिक आदिवासी दिवस नंदुरबार जिल्ह्यात अत्यंत धुमधडाक्यात साजरा केला जातो. चर्चासत्र, मेळावे, परिसंवाद, नृत्य समूहांसह मिरवणुका, प्रतिमापूजन अशा अनेक कार्यक्रमांची रेलचेल असते. वेगवेगळे विषय घेवून सप्ताह साजरा केला जातो. शहरात विविध जनसंघटनांच्यावतीने रक्तदान शिबिरे, आरोग्य तपासणी शिबिरे, अन्नदान आयोजित केले जातात. खेड्या-पाड्यातील समाज बांधव हजारोंच्या संख्येने दरवर्षी उपस्थित असतात. तथापि यावर्षी नंदुरबार, शहादा, तळोदा व नवापर या शहरामध्ये कोरोनाचा प्राभाव अधिक असल्यामुळे यंदा तसे करणे उचित होणार नाही. म्हणून या शहरांमध्ये येऊन अजिबात गर्दी करु नये, असे आवाहन आदिवासी महा संघाने केले आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार