सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

एनसीबीचा वादग्रस्त पंच किरण गोसावीला अटक

किरण गोसावीविरोधात पुणे पोलिसांत फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता

Sudarshan MH
  • Oct 28 2021 10:36AM

क्रूझवरील अंमलीपदार्थ प्रकरणातील पंच किरण गोसावीला पुणे पोलिसांनी अटक केलं आहे. किरण गोसावीविरोधात पुणे पोलिसांत फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. यानंतर पोलीस त्याचा शोध घेत होते. गेल्या अनेक दिवसांपासून गुंगारा देणाऱ्या किरण गोसावीला अखेर पोलिसांनी अटक केली आहे. क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणी शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान अटकेत असून सध्या आर्थर रोड जेलमध्ये आहे. गुन्हे शाखेकडून किरण गोसावीविरोधात कारवाई करण्यात आली असून पोलीस आयुक्तालयात आणण्यात आलं आहे.

किरण गोसावीवर नोकरींच अमिष दाखवत तरुणाची फसवणूक केल्याचा आरोप आहे. किरण गोसावीविरोधात फरासखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. किरण गोसीवाचा शोध घेताना पुणे पोलिसांचं एक पथक लखनऊतही पोहोचलं होतं. दरम्यान पुणे पोलिसांना अखेर यश मिळालं असून किरण गोसावीला अटक केली आहे.

“किरण गोसावीला फसवणुकीप्रकरणी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मात्र कुठून ताब्यात घेतले आहे हे आम्ही सांगू शकत नाही काही वेळात त्याला कोर्टात हजर केले जाणार आहे,” असल्याची माहिती पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिली आहे.

आर्यन खान प्रकरणावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर अनेक आरोप केले आहेत. यामुळे राज्यात सध्या खळबळ उडाली असून समीर वानखेडेंच्या कुटुंबीयांकडूनही स्पष्टीकरण दिलं जात आहे. दुसरीकडे एनसीबीचा साक्षीदार प्रभारक साईलने जबाब पलटला असून समीर वानखेडेंवर आरोप केले असून यात किरण गोसावीचाही समावेश आहे. प्रभाकर साईल हा किरण गोसावीचा अंगरक्षक होता. किरण गोसावीच्या अटकेमुळे आर्यन खान प्रकरणी मोठे खुलासे होण्याची शक्यता आहे. आर्यनला अटक केल्यानंतर त्याच्यासोबत काढलेल्या सेल्फीमुळे किरण गोसावी चर्चेत आला होता. यानंतर नवाब मलिकांनी त्याचा उल्लेख करत अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत.

आर्यन खान ड्रग्ज प्रकरणी साक्षीदार बनलेला किरण गोसावी लखनऊमध्ये शरण येणार होता. गोसावीवर त्याच्या अंगरक्षक प्रभाकर साईलने शाहरुखकडून कोट्यवधीची खंडणी मागितल्याचा आरोप केला आबे. किरण गोसावीचा सुरुवातीच्या काळात आर्यन खानसोबत त्याचा एक सेल्फीही व्हायरल झाला होता. मात्र, त्यानंतर किरण गोसावी फरार झाल्यामुळे त्याच्याबद्दल मोठी चर्चा सुरू झाली होता. या दरम्यान गोसावी उत्तर प्रदेशमध्ये पोलिसांना शरण येणार असल्याची माहिती मिळाली होती.

२०१८ मध्ये कसबा पेठ परिसरात राहणारा चिन्मय देशमुख हा नोकरीच्या शोधत होता. त्यावेळी त्याची किरण गोसावी आणि शेरबानो कुरेशी यांच्या सोबत ऑनलाईन ओळख झाली. या दोघांनी चिन्मयला मलेशियामध्ये चांगल्या पगाराची नोकरी लावतो असे सांगितले. त्यावर त्याच्याकडे वेळोवेळी पैशांची मागणी केली. त्यानुसार चिन्मयने तीन लाख रुपये दिले. मात्र तरी देखील नोकरी बाबत काही सांगितले गेले नाही. त्यावर अखेर त्यांनी फसवणुक झाल्याची तक्रार दिली होती.

या तक्रारीच्या आधारे किरण गोसावी आणि शेरबानो कुरेशी यांना पोलिसांनी चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले होते. मात्र त्याला दोघांनीही काही प्रतिसाद दिला नव्हता. त्यावर दोघा आरोपींच्या शोधासाठी विविध ठिकाणी पथके रवाना करण्यात आली. यानंतर किरण गोसावीची मैत्रीण शेरबानो कुरेशी हिला मुंबईतून अटक करण्यात आली आहे. तसंच, किरण गोसावीविरोधात लुकआऊट नोटीस काढण्यात आली होती.

 

 

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार