सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

पिंपरी चिंचवड महानगरपलिकेने कंत्राटी कामगारांना सुध्दा दिवाळी बोनस द्यावा- डॅा.कैलास कदम

कंत्राटी कामगारांची दिवाळी गोड करा

Abhimanyu
  • Oct 25 2021 10:04PM
प्रतिनिधि:-पुणे

पिंपरी चिंचवड शहरातील आठ प्रभाग मध्ये १६०० महिला आणि पुरुष कर्मचारी रस्ते सफाईचे काम  करीत आहेत.  सफाई कामगारांच्या बरोबर  अन्यायकारक आणि भेदभावाची  भूमिका महापालिकेनी घेतलेली दिसून येते.कंत्राटी ठेकेदार पध्दतीचा अवलंब करुन साफसफाईचे काम करुन घेण्यासाठी हजारहून अधिक कामगार काम करीत आहेत.  परंतु त्यांना मिळणार कामाचा मोबदला हा त्यांचा कामाच्या स्वरुपा पेक्षा अत्यंत अल्प आणि कमी आहे तसेच कामाचा मोबदला कधी ही वेळेवर मिळाला नाही.कोणत्याही कामगार कायद्याची अंमलबजावणी केली जात नाही. कोरोना काळात निस्वार्थपणे सेवा देणा-या सफाई कामगारांना सणासुदीला वेळेवर बोनस देण्यासंदर्भात महापालिकेने कोणतीही  अधिकृत सुचना दिली नाही. 

महानगरपालिकेतील घंटा गाडी कर्मचारी याना रू.४० हजार दिवाळी बोनस स्थायी समितीने प्रस्ताव मंजूर केला पण महानगरपालिकेने कंत्राटी कामगारांना बोनस पासून वंचित ठेवण्याचे काम केले आहे हे अन्यायकारक आहे”असे कदम म्हणाले. 

याबाबत पिंपरी चिंचवड शहर काँग्रेसचे अध्यक्ष डॉ.कैलास कदम यांच्या मार्गदर्शनाखाली कंत्राटी कामगारांना हक्काचा बोनस मिळायला हवा म्हणून महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप यांच्या सोबत चर्चा झाली. शहरातील विविध भागातील कंत्राटी कामगारांना हक्का बोनस देण्यासंदर्भात महापालिकेचे आयुक्त राजेश पाटील यांच्या सोबत उद्या चर्चा करून भेटीची वेळ निश्चित करण्यात येणार आहे.  या प्रसंगी  युवक काँग्रेस शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे, माऊली मल्लशेट्टी, रयत विद्यार्थी परिषदेचे अध्यक्ष सूर्यकांत सरवदे, ओमकार भोईर, ऋषिकेश कानवटे व महिला कामगार आदि उपस्थित होते.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार