सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

*आचार्य जितेंद्रनाथ महाराजांना अयोध्येचे निमंत्रण* *महाराष्ट्रातुन पवित्र मृत्तिका व जल भूमिपूजनाला नेणार*

समस्त रामभक्त हिंदू समाजात आनंदाची लहर उसळली आहे. श्रीनाथ पीठ , श्रीदेवनाथ मठ हे भारतातील एक प्रमुख आध्यात्मिक आचार्य पीठ म्हणून ओळखल्या जाते. सुमारे ६०० वर्षांपासून विद्यमान असणाऱ्या प्राचीन श्रीनाथ पीठाचे स्वामी श्रीजितेंद्रनाथ महाराज हे अठरावे पीठाधीश असून अनेक शतकांपासून श्रीरामजन्मभूमी आंदोलनात या पीठाची सक्रीय भूमिका राहीली आहे.

Snehal Joshi .
  • Jul 31 2020 8:53PM
अयोध्या येथील श्रीरामजन्मभूमीवर मंदीर निर्माणकार्यातील भूमिपूजन समारोहाकरीता श्रीराम मंदीर तीर्थक्षेत्र न्यासातर्फे प्रधानमंत्री कार्यालयातून जारी निमंत्रणानुसार महाराष्ट्रातून श्रीदेवनाथ मठ ,अंजनगाव सुर्जीचे ,श्रीनाथ पीठाधीश्वर आचार्य स्वामी श्रीजितेंद्रनाथ महाराज हे अयोध्येकडे रवाना होत आहेत. ही वार्ता विदर्भ -महाराष्ट्रात पसरताच समस्त रामभक्त हिंदू समाजात आनंदाची लहर उसळली आहे. श्रीनाथ पीठ , श्रीदेवनाथ मठ हे भारतातील एक प्रमुख आध्यात्मिक आचार्य पीठ म्हणून ओळखल्या जाते. सुमारे ६०० वर्षांपासून विद्यमान असणाऱ्या प्राचीन श्रीनाथ पीठाचे स्वामी श्रीजितेंद्रनाथ महाराज हे अठरावे पीठाधीश असून अनेक शतकांपासून श्रीरामजन्मभूमी आंदोलनात या पीठाची सक्रीय भूमिका राहीली आहे. अलीकडच्या एकोणविसाव्या शतकात स्वामी गोविंदनाथ यांनी प्रयागराज येथून संघर्ष केला. ब्रम्हलीन मनोहरनाथ महाराज यांनी श्रीराम मंदिरांसाठी नित्य संघर्ष केला याच गुरुपरंपरेचे निर्वहन करीत आचार्य जितेंद्रनाथ महाराज यांनी रामजन्मभूमी मुक्ती आंदोलनात महत्वपूर्ण व निर्णायक भूमिका बजावली. आचार्य स्वामी जितेंद्रनाथ हे विश्व हिंदू परिषदेच्या उच्चाधिकार समितीचे सदस्य , केंद्रीय मार्गदर्शक मंडळाचे सदस्य आणि धर्मजागरण मंचाचे केंद्रीय मार्गदर्शक आहेत. गेल्या वर्षीच जितेंद्रनाथ महाराजांनी देशभर प्रवास करून विभिन्न राज्यात लाखोंच्या संख्येने घेतलेल्या हुंकार सभेने हिंदू समाजात चैतन्य आणले. देश धर्मकार्यासाठी प्रचंड जनजागरण व देशव्यापी प्रवास केल्यामुळे रामजन्मभूमी आंदोलनातील प्रमुख संतांमध्ये आचार्य जितेंद्रनाथ यांची ठळक भूमिका आहे. येत ५ ऑगस्ट रोजी भारताच्या पंतप्रधानाच्या हस्ते व समस्त संतांच्या पावन उपस्थितीत संपन्न होणाऱ्या या ऐतिहासिक सोहोळ्यासाठी जितेंद्रनाथ महाराजांना सम्मानपूर्वक निमंत्रण आल्याने विदर्भाला मानाचे स्थान प्राप्त झाल्याची चर्चा आहे. निमंत्रण आल्याची बातमी येताच श्रीक्षेत्र सुर्जी अंजनगाव येथे त्यांना भेटण्याचा रामभक्तांचा ओघ वाढला असून, किल्ले शिवनेरी, विदर्भातील प्रमुख धार्मिक स्थाने, त्र्यंबकेश्वर येथील महाकुंभस्थानाचे गंगा - गोदावरी तीर्थ आदी अनेक स्थानांची मृत्तिका तसेच तीर्थ सुर्जी अंजनगाव येथे जितेंद्रनाथ महाराजांना सोपविण्यात येत आहे. गेल्या २०१२ व २०१६ साली श्रीरामजन्मभूमी मुक्ती आंदोनाला धरून हजारो संत व लाखो भाविकांच्या उपस्थितीत अमरावती व नागपूर येथे स्वामी जितेंद्रनाथ महाराजांनी धर्मसंस्कृती महाकुंभ संपन्न केला होता तसेच १०८ करोड हनुमान चालीसा सव्वादोन हजार करोड महावासुदेव मंत्र जप व १०८ कोटी शिवमहीम्न अनुष्ठान स्वामी जितेंद्रनाथ महाराज यांनी संपन्न केले होते. आचार्य स्वामी श्रीजितेंद्रनाथ महाराज यांनी प्रयागराज - हरिद्वार व उज्जैन महाकुंभातून तसेच उडुपी धर्मसंसदेतून रामजन्मभूमी मुक्तीचा विषय प्रखरतेने देशभरात नेला होता हे विशेष. महाराष्ट्र व विदर्भातील संत समुदायाने व जनतेने या निमंत्रणावर आनंद व्यक्त केला असून विश्व हिंदू परिषदेच्या वतीने प्रांत अध्यक्ष श्री राजेश्वर निवल, प्रांत मंत्री श्री गोविंद शेंडे आणि प्रांत धर्माचार्य संपर्क प्रमुख ह. भ.प बाबुराव लंके महाराज यांनी जितेंद्रनाथ महाराज यांचे अभिनंदन केले आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार