सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

आघाडी सरकारची नाराजी पहिल्यांदाच पवारांनी केली उघडी*

राऊत यांनी घेतलेल्या मुलाखतीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 'गाडीचे स्टेअरिंग माझ्याकडेच आहे' या वक्तव्यानंतर महाविकास आघाडीमध्ये वातावरण बिघडले आहे.

Snehal Joshi .
  • Jul 29 2020 11:27AM
राऊत यांनी घेतलेल्या मुलाखतीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 'गाडीचे स्टेअरिंग माझ्याकडेच आहे' या वक्तव्यानंतर महाविकास आघाडीमध्ये वातावरण बिघडले आहे. आता खुद्ध राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी 'महाविकास आघाडी सरकारचा रिमोट माझ्याकडे नाही, काही नेते अस्वस्थ आहे' असा टोला लावला आहे. तसंच, उद्धव ठाकरे यांच्या कारभारावरही नाराजी व्यक्त केली आहे. एका खाजगी चॅनला दिलेल्या विशेष मुलाखतीत बोलत असताना शरद पवार यांनी भाजप नेत्यांवर सडकून टीका केली. तसंच महाविकास आघाडीबद्दल भाष्यही केले. 'सध्या नवीन पर्याय नसल्याने हे सरकार 5 वर्ष चालणार आहे. पण भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस चांगलेच अस्वस्थ आहेत. त्यांना सरकार पाडण्याची घाई आहे. पण सध्याची परिस्थिती पाहता निवडणूक कोणालाही नको आहे' असं म्हणत पवारांना फडणवीसांना देखील टोला हाणला. धोरणात्मक निर्णय मुख्यमंत्री घेत आहे. प्रशासन घेत नाही. विशेषतः सर्व सहकाऱ्यांना मुख्यमंत्री विश्वासात घेत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे काम चांगले आहे. त्यांनी एका ठिकाणी बसून परिस्थिती सांभाळावी यात कोणताही वाद नाही. पण थोडं फिरलंही पाहिजे' असंही शरद पवारांनी स्पष्टपणे सांगितले आहे. गेल्या काही दिवसांपासून विरोधकांकडून मुख्यमंत्री मातोश्रीवरच असता अशी टीका होत आहे. त्यावर पवारांनी आपली भूमिका स्पष्ट केली. 'उद्धव ठाकरे यांच्या सरकारला चिंता नाही. ते सहकाऱ्यां ही सल्लामसलत करून काम करत आहे',

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार