सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

माध्यमांना सांगतात..*पाच वर्षे पूर्ण करणार*

माध्यम समूहातील प्रत्येक मुलाखतीत आघाडी सरकार आग्रहाने सांगत की मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेत पाच वर्षाचा कार्यकाळ आम्ही पूर्ण करणार.

Snehal Joshi .
  • Jul 18 2020 7:58PM
भाजपामध्ये गेलेले अनेक आमदार काँग्रेसच्या संपर्कात आहेत आणि ते पुन्हा काँग्रेसमध्ये परतू शकतात, असा काँग्रेस नेत्या आणि महिला आणि बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर त्यांनी दावा केला. महाराष्ट्रानं देशाला नवा फॉर्म्युला दिला असून आमचं सरकार यशस्वीपणे 5 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करेल, असं देखील त्या म्हणाल्या. ऑक्टोबरपर्यंत ठाकरे सरकार पाडण्याचे प्रयत्न सुरू असल्याचं काही दिवसांपूर्वी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटलं होतं. त्यावर भाष्य करताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकार अंतर्विरोधामुळे कोसळेल, असं म्हटलं. त्यावर बोलतान भाजपानं त्यांच्या १०५ आमदारांवर नीट लक्ष ठेवावं, असे विधान यशोमती ठाकूर यांनी एका माध्यमाशी बोलताना म्हटले. 'कोरोना संकट काळात महाविकास आघाडी सरकारबद्दल अफवा पसरवल्या जात आहेत. सरकारमध्ये असलेल्या घटक पक्षांमध्ये आलबेल नसल्याच्या चर्चा घडवून आणल्या जात आहेत. विरोधी पक्षांनी त्यांचा प्राधान्यक्रम निश्चित करण्याची आवश्यकता आहे. सत्तेत नसल्यानं काहींना असुरक्षित आणि अस्वस्थ वाटत आहे,' अशा शब्दांत पर्यटन मंत्री आणि शिवसेना नेते आदित्य ठाकरे विरोधकांवर बरसले. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीदेखील महाविकास आघाडीचं सरकार पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणार आहे, असा विश्वास व्यक्त केला. एका प्रसिद्ध वर्तमानपत्रात दिलेल्या मुलाखतीत पवारांनी आपण सरकारचे रिमोट कंट्रोल नसल्याचं स्पष्ट केलं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांचे मंत्री सरकार चालवतात, असं पवार म्हणाले. पक्ष तीन असले, तरीही त्यांचा उद्देश एकच असल्याचं देखील पवार या मुलाखतीत म्हणाले होते.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार