सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

*9 महिन्याच्या मुलीचा बापानं केला अंत.कोरोना चा असाही एक बळी.*

कोरोना काळात बेरोजगार झालेल्या एका पित्याचे हृदय किती हेलकावे खाणारे असेल. की त्याने आपल्या चिमुरडीचा अंत करावा. मात्र सवाल असा उठतो की हा बळी कोणाचा ? उत्तर एकच.... कोरोना, covid ची बेरोजगारीचा.

Snehal Joshi
  • Jul 17 2020 12:26PM
नागपूर : गेल्या चार महिन्यांपासून सोनू शेख हा बेरोजगार होता. त्यामुळे घरात आर्थिक चणचण होती. घरातील खर्चही भागत नसल्यामुळे तो चिडचिड करीत होता. लहान-सहान गोष्टीवरून वाद घालत होता. खिशात पैसे नसल्यामुळे तो जीवनाला कंटाळला होता. मुलीच्या दुधाचाही खर्च तो करू शकत नव्हता. आई-वडील आणि भावांच्या कमाईवर घर चालत होते. "मैं कैसा बाप हुँ जो अपने बच्ची के दुध का भी खर्चा नहीं उठा सकता' असे बोलून सोनू मुलीला घेऊन घराबाहेर पडला अन्‌...  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोनू शेख (वय 30) हा खासगी वाहनावर चालक आहे. गुरुवारी दुपारी त्याचा पत्नी तबस्सूम (वय 22) सोबत वाद झाला. त्यामुळे सोनू संतापला. तो नऊ महिन्यांच्या मुलीला घेऊन शंकर साई मठ येथे आला. येथील ड्रममधील पाण्यात अलविनाला बुडवून ठार मारले. त्यानंतर सोनू याने बिअरची बाटली फोडली. फुटलेल्या बाटलीने गळ्यावर सपासप वार केले. रक्ताच्या थारोळ्यात तो पडला. काही नागरिकांच्या प्रकार लक्षात आला. त्यांनी घटनेची माहिती सक्करदरा पोलिसांना दिली. माहिती मिळताच वरिष्ठ पोलिस निरीक्षक सत्यवान माने यांच्यासह पोलिसांचा ताफा तेथे पोहोचला. पोलिसांनी जखमी सोनू याला मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये दाखल केले. ड्रममधून अलविनाचा मृतदेह बाहेर काढला. पंचनामा करून मृतदेह मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये उत्तरीय तपासणीसाठी रवाना केला. याप्रकरणी सक्करदरा पोलिसांनी खुनाचा व आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.  पत्नीसोबत क्षुल्लक वाद झाल्यानंतर रागाच्या भरात पित्याने नऊ महिन्यांच्या चिमुकलीला पाण्याच्या ड्रममध्ये बुडवून खून केला. त्यानंतर बिअरच्या बॉटलने स्वतःचा गळा चिरून आत्महत्येचा प्रयत्न केला. गंभीर जखमी पित्यावर मेडिकल रुग्णालयात उपचार सुरू असून, प्रकृती चिंताजनक आहे. पाच दिवसांपासून सोनू हा तणावात होता. त्याने पत्नी तबस्सूमला बुधवारी तयारी करून ठेवण्यास सांगितले. पत्नी आणि मुलीला घेऊन तो थेट फोटो स्टुडिओत पोहोचला. त्याने "फॅमिली फोटो' काढून घेतले. "फोटो संभालकर रखना. ये अपनी आखरी यादें होंगी' असे तो पत्नीला म्हणाला. परंतु, पत्नीने त्याच्या बोलण्याकडे लक्ष दिले नाही. या वाक्यांने कोरोना काळात बेरोजगार झालेल्या एका पित्याचे हृदय किती हेलकावे खाणारे असेल. की त्याने आपल्या चिमुरडीचा अंत करावा. मात्र सवाल असा उठतो की हा बळी कोणाचा उत्तर एकच.... कोरोना, covid ची बेरोजगारी. 

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

0 Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार