सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

*सचिन पायलट यांना समर्थन दिल्यास काय होणार? हे होणार...*

महाराष्ट्रात देखील सचिन पायलट यांचे समर्थन केल्यामुळे काँग्रेस प्रवक्ते संजय झा यांचे पक्षातून निलंबन करण्यात आले आहे.

Snehal Joshi .
  • Jul 16 2020 1:25PM
राजस्थानमध्ये सचिन पायलट यांची बंडखोरी केल्यामुळे उपमुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्ष पदावरून हकालपट्टी करण्यात आली. त्यानंतर महाराष्ट्रात देखील सचिन पायलट यांचे समर्थन केल्यामुळे काँग्रेस प्रवक्ते संजय झा यांचे पक्षातून निलंबन करण्यात आले आहे. पक्षविरोधी कारवाई आणि शिस्तभंग केल्याप्रकरणी संजय झा यांच्यावर काँग्रेसने कारवाई केली आहे. राजस्थानमधील राजकीय घडामोडींवर आधारित टीव्हीवरील एका चर्चासत्रात संजय झा काँग्रेसवरच टीका करताना दिसले. त्यामुळे त्यांना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी पक्षातून निलंबन केले. मध्यप्रदेश नंतर राजस्थानमध्ये राजकीय पेच निर्माण झाला आहे. युवानेते सचिन पायलट यांची हकालपट्टी केल्यामुळे त्यांच्या समर्थानात ३०० पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहे. दरम्यान, मध्यप्रदेश, राजस्थान नंतर आता महाराष्ट्रात राजकीय समीकरणे बदलणार, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. 

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार