सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

*20 पेक्षा जास्त व्यक्ती आढळल्यास आयोजक आणि मंगल कार्यालयावर 10 हजार रुपये दंड*

50 लोकांपेक्षा जास्त लोक विवाह साठी उपस्थित राहत असल्याचे निदर्शनास आल्यामुळे आता विवाहासाठी केवळ 20 लोकांनाच उपस्थित राहता येईल असे आदेश जिल्हाधिकारी विवेक भिमनवार यांनी आज दिले आहेत.

Snehal Joshi
  • Jul 11 2020 8:54PM
वर्धा, (जिमाका):- लॉकडाउनच्या काळात विवाहासाठी मंगल कार्यालयात पन्नास लोकांच्या उपस्थितीत विवाह सोहळा पार पडण्यास जिल्हाधिकारी यांनी परवानगी दिली होती. मात्र 50 लोकांपेक्षा जास्त लोक विवाह साठी उपस्थित राहत असल्याचे निदर्शनास आल्यामुळे आता विवाहासाठी केवळ 20 लोकांनाच उपस्थित राहता येईल असे आदेश जिल्हाधिकारी विवेक भिमनवार यांनी आज दिले आहेत. यापुढे विवाह सोहळ्याकरीता फक्त 20 व्यक्तींनाच (वधु पक्षाकडील 10 व्यक्ती व वर पक्षाकडील 10 व्यक्ती) उपस्थित राहता येईल. विवाह सोहळ्याकरीता उपस्थित असणाऱ्या सर्व व्यक्तींना 14 दिवसांकरीता विलगीकरणात राहणे अनिवार्य राहील.विवाह सोहळ्याकरीता बाहेर जिल्ह्यातील व्यक्तींना उपस्थित राहता येणार नाही. (अपवाद फक्त वर किंवा वधु व त्यांच्यासोबत 4 व्यक्ती ) विवाह सोहळ्याकरीता बाहेर जिल्ह्यातील व्यक्ती उपस्थित राहील्यास आयोजकावर कलम 188 अन्वये गुन्हा दाखल करण्यात येऊन त्यांचेकडून 10 हजार रुपये दंड वसुल करण्यात येईल. कंटेन्मेंट झोनमधील व्यक्तींना विवाह सोहळ्याकरीता उपस्थित राहता येणार नाही. उपस्थित राहिल्यास कलम 188 अन्वये गुन्हा दाखल करण्यात येईल. विवाह सोहळ्याकरीता संबंधीत तहसिलच्या तहसिलदारांची परवानगी घेणे बंधनकारक राहील. विनापरवानगी विवाह सोहळा आयोजित केल्यास आयोजक तसेच उपस्थि सर्व व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात येईल. विवाहापुर्व किंवा विवाहानंतर कोणताही कार्यक्रम, समारंभाचे आयोजन करता येणार नाही. यापुढे विवाहास्थळी संबंधीत तहसिलदार एका कर्मचाऱ्याची नियुक्ती करतील. तसेच तहसिलदार मार्फत परवानगी प्राप्त यादी व्यतिरिक्त अन्य कोणी व्यक्ती उपस्थित राहील्यास अशा व्यक्तीवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल. मंगल कार्यालयामध्ये विवाह सोहळा आयोजित करावयाचा असल्यास केवळ 20 लोकांच्या उपस्थित करता येईल. 20 पेक्षा अधिक व्यक्ती उपस्थित असल्यास मंगलकार्यालय सिल करण्यात येऊन मालकाकडून 10 हजार रुपये दंड आकारण्यात येणार आहे. या आदेशातील कोणत्याही अटी व शर्तीचे उल्लंघन केल्यास त्यांच्यावर कलम 188 अन्वये गुन्हा दाखल करण्यात येईल असे जिल्हाधिकारी यांनी आदेशात म्हटले आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार