सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

*चिनी कंपन्या रस्ते प्रकल्पात बंद होणार*- गडकरी

लडाखला लागून असलेल्या चीनच्या सीमेवरील तणाव पूर्ण परिस्थितीच्या पृष्ठभूमीवर केंद्र सरकारने मंगळवारी चीनच्या 50 मोबाईल अँप्स वर बंदी घातलं, चीनला जबरदस्त झटका दिला होता.आज गडकरी यांनी राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांच्या कामात चीनच्या कंपन्यांना तसेच चीनची भागीदारी असलेल्या कंपन्यांना प्रतिबंधित करण्याची घोषणा करीत, चीनला दुसरा मोठा झटका दिला आहे

Snehal Joshi
  • Jul 2 2020 11:38AM
राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पाच्या कामात यापुढे कोणतीही चीनी कंपनीला तसेच चीनी ची भागीदारी असलेल्या कंपनीला प्रवेश न देण्याची घोषणा केंद्रीय भूपृष्ठ परिवहन आणि मार्ग प्रकल्प मंत्री नितीन गडकरी यांनी बुधवारी केली आहे. लडाखला लागून असलेल्या चीनच्या सीमेवरील तणाव पूर्ण परिस्थितीच्या पृष्ठभूमीवर केंद्र सरकारने मंगळवारी चीनच्या 50 मोबाईल अँप्स वर बंदी घातलं, चीनला जबरदस्त झटका दिला होता.आज गडकरी यांनी राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांच्या कामात चीनच्या कंपन्यांना तसेच चीनची भागीदारी असलेल्या कंपन्यांना प्रतिबंधित करण्याची घोषणा करीत, चीनला दुसरा मोठा झटका दिला आहे. चीनी कंपन्यांना देशात प्रतिबंधित करण्याबाबतचे धोरण सरकार लवकरच आणणार असल्याची घोषणा करत गडकरी म्हणाले की, देशातील सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्रातही चीनच्या कंपन्या गुंतवणूक करू शकणार नाहीत, याची काळजी सरकार घेणार आहे. एखादी छोटी भारतीय कंपनी नियमानुसार छोट्या प्रकल्पांसाठी पातळ असेल तर ती मोठ्या प्रकल्पांसाठी ही पात्र ठरली पाहिजे या दृष्टीने नियमात योग्य त्या दुरुस्ती करण्याचे निर्देश मंत्रालयाचे सचिव तसेच NHAI च्या अध्यक्षांना दिले आहे. असे गडकरी यांनी सांगितले. यापुढे मोठ्या प्रकल्पांसाठी नियमच असे बनवले जातील, की भारतीय कंपन्यांवर कोणत्याही परदेशी कंपन्यांना आपल्याकडे भागीदारी म्हणून आमंत्रित करून संयुक्त उपक्रम बनवण्याची वेळ येणार नाही. यापुढे कोणतीही भारतीय कंपनी तंत्रज्ञान, सल्लागार तसेच डिझाईन साठी चीन कंपनीसोबत संयुक्त उपक्रम बनवत असेल,तर त्या कंपनीलाही काम न देण्याची आमची भूमिका राहणार आहे. असे त्यांनी स्पष्ट केले.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार