सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

*स्थानिक बेरोजगारांना रोजगार दिला जावा-- खासदार तुमाने*

कोरोना ने सर्वत्र संकटाचे वातावरण तयार झाला आहे. त्यात मिहान प्रकल्पावर ही प्रतिकूल असा परिणाम झाला आहे. या स्थितीत स्थानिक बेरोजगारांना रोजगार कसा देता येईल. यावर अधिकाऱ्यांनी भर घाला असे निर्देश खासदार कृपाल तुमाने यांनी दिले.

Snehal Joshi
  • Jun 28 2020 11:31PM
कोरोना ने सर्वत्र संकटाचे वातावरण तयार झाला आहे. त्यात मिहान प्रकल्पावर ही प्रतिकूल असा परिणाम झाला आहे. या स्थितीत स्थानिक बेरोजगारांना रोजगार कसा देता येईल. यावर अधिकाऱ्यांनी भर घाला असे निर्देश खासदार कृपाल तुमाने यांनी दिले. मिहान प्रकल्प आणि कोरोनाचा परिणाम या अनुषंगाने आयोजित बैठकीत खासदार कृपाल तुमाने बोलत होते. यावेळी मिहानचे महाव्यवस्थापक चॅटर्जी, मुख्य अभियंता अक्रम अली, तांत्रिक सल्लागार चहांदे, अतिरिक्त जिल्हाधिकारी प्रकाश पाटील उपस्थित होते. विदर्भाचा कायापालट करण्याची ताकत मिहान प्रकल्पात आहे. मात्र या प्रकल्पत उद्योग उभारणे सोपे नाही. कारण येथील भूखंड महाग आहेत. शिवाय येथील भूखंडाचे आकारमानही अधिक आहे. परिणामी लहान उद्योजकांना समजा उद्योग करायचा असेल तर नियमात बसवून ते व्यवसाय उभारता येत नाही. यावर खासदार कृपाल तुमाने यांनी अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले. वस्तुतः हा मिहान उद्योग उभारण्यासाठी आहे. उद्योग किती मोठा यापेक्षा त्यातून मिळणारा रोजगार महत्त्वाचा असतो. पण आपण मिहानची जी काही आखणी केली ती केवळ मोठमोठ्या कंपन्यांना डोळ्यासमोर ठेवूनच केली आहे. या कारणाने छोट्या उद्योजकांना येथे इच्छा असूनही येता येत नाही. त्यांना येथे आणायचे असेल तर तातडीने 10 ते 20 हजार चौरस फूट आकाराचे भूखंड मोठ्या प्रमाणात उपलब्ध करून द्यावेत असे खासदार कृपाल तुमाने यांनी स्पष्ट केले. खासदारांचे हे वाक्य ऐकून अधिकाऱ्यांनाही त्याला दुजोरा देत तातडीने यावर अंबलबजावणी केली जाईल अशी ग्वाही दिली. मिहानमध्ये आता लहान भूखंड उपलब्ध झाल्यास लघु उद्योजकांना चालना मिळेल. परिणामी आपण मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध करून देण्यातही यशस्वी होणार आहोत असेही खासदार कृपाल तुमाने यांनी सर्वांना पटवून दिले. विदर्भाचा कायापालट करण्यासाठी मिहान प्रकल्प उदयास आला आहे. पण येथील बेरोजगारांना रोजगार दिला जात नाही. बाहेरील लोकांना प्राधान्य देण्यात येते. हा इथल्या स्थानिकांवर अन्याय आहे. खासदार कृपाल तुमाने यांनी स्थानिक बेरोजगार युवक-युवतींना यापुढे प्राधान्य दिले जावे असे स्पष्ट निर्देश अधिकाऱ्यांना दिले.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

0 Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार