सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन

तंत्रज्ञान हे मानवी सर्जनशीलतेचे द्योतक आहे. याच सर्जनशीलतेच्या जोरावर आपल्या नैसर्गिक क्षमतांच्या हजारोपट पुढे जाऊन मानवाने भौतिक, सामाजिक, सांस्कृतिक, अवकाशीय अशा प्रत्येक क्षेत्रात प्रगतीचे एकामागोमाग अनेक टप्पे गाठले आहेत.

Sudarshan MH
  • May 12 2021 10:14AM


तंत्रज्ञान हे मानवी सर्जनशीलतेचे द्योतक आहे. याच सर्जनशीलतेच्या जोरावर आपल्या नैसर्गिक क्षमतांच्या हजारोपट पुढे जाऊन मानवाने भौतिक, सामाजिक, सांस्कृतिक, अवकाशीय अशा प्रत्येक क्षेत्रात प्रगतीचे एकामागोमाग अनेक टप्पे गाठले आहेत. याचाच एक भाग म्हणून भारताने तंत्रज्ञानाच्या मदतीने एका बाजूने अणुऊर्जा कामी आणली आणि दुसऱ्या बाजूने अनंत अवकाशात भरारी घेतली. त्यामुळे देशात तंत्रज्ञानाची क्रांती झाली. तंत्रज्ञानाच्या जोरावर देशाच्या सामर्थ्यात अणुशक्तीची भर घालणारा दिवस म्हणून ११ मे हा दिन "राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस" म्हणून देशभर साजरा केला जातो.

भारत देशासाठी ११ मे हा दिवस अतिशय खास आहे. हा दिवस देशाच्या इतिहासात सन १९९८ सालची पोखरण अणुचाचणी आणि अंतराळातील भारताची मोठी प्रगती म्हणून ओळखला जातो. ११ मे १९९८ मध्ये भारताच्या राजस्थानमधील पोखरण येथे भारताने तीन अणुचाचण्या यशस्वीरित्या पूर्ण केल्या. या अणुचाचणीचे सांकेतिक नाव "ऑपरेशन शक्ती" असे होते. या अणुचाचणीमुळे भारत देश जगभरात अणुशक्तिशाली राष्ट्र म्हणून उदयाला आले. डॉ. एपीजे अब्दुल कलाम, आर. चिदम्बरम तसेच अनिल काकोडकर हे या चाचण्यांचे शिल्पकार होते. याच काळात  अण्वस्त्रांच्या यशस्वी चाचण्या होत असतांना देशाने आणखी एक यश संपादन केले. बंगलोरच्या नॅशनल एरोस्पेस लॅबोरेटरीजने विकसित केलेले पहिले स्वदेशी विमान "हंस -३" या देशी बनावटीच्या लहान विमानाने अवकाशामध्ये झेप घेतली. हे विमान वैमानिकांना प्रशिक्षण देण्यासाठी, आकाशातून छायाचित्रण करण्यासाठी, पर्यावरण प्रकल्पांसाठी आणि टेहळणी करण्यासाठी अतिशय उपयोगी आहे. याचबरोबर ११ मे १९९८ ला संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (डिफेन्स ऑफ रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन) या महत्त्वपूर्ण संस्थेकडून "त्रिशूल" या क्षेपणास्त्राची अंतिम चाचणी यशस्वीरीत्या पूर्ण केली गेली. भारतीय लष्कर आणि भारतीय वायुसेनेनेची शक्ती वाढवुन मदत करणारे व लहान पल्यावरील लक्ष टिपणारे हे क्षेपणास्त्र जमिनीवरुन अवकाशात मारा करणारे आहे. या तीनही गोष्टीत भारतीय तंत्रज्ञानाने प्राप्त केलेले अभूतपूर्व यश म्हणजे देशाच्या क्रांतीची झळाळती साक्ष होय. अणुचाचणी करून भारताने जगात आपला दबदबा वाढवला होता. देशाचे महान वैज्ञानिक व माजी राष्ट्रपती डॉ.एपीजे अब्दुल कलाम आणि तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी बाजपेयी यांच्यामुळे जगातील कधीही न संपणार्‍या पाश्चात्त्य देशांच्या शक्तीला आणि वर्चस्वाला भारताने आव्हान दिले होते. या यशस्वी प्रयोगानंतर तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी भारताला अण्वस्त्रधारी देश म्हणून घोषित केले. ११ मे १९९८ रोजी भारताने केलेल्या अणुचाचणीने आपल्या तंत्रज्ञानातील प्रगती जगाला दाखवत भारत देशाचे सामर्थ्य वाढविले. या प्रगतीचे प्रतीक म्हणून तसेच प्रत्येक पिढीला अधिकाधिक प्रगती करण्याची प्रेरणा देण्यासाठी सन १९९९ पासून ११ मे हा दिवस दरवर्षी "राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस" म्हणून साजरा केला जातो.


आज २१ व्या शतकात भारताची तंत्रज्ञानाच्या प्रत्येक क्षेत्रात यशस्वी वाटचाल होत आहे. देशासमोरील भविष्यातील तंत्रज्ञानाचे आव्हान पेलण्याची क्षमता कायम ठेवण्यासाठी देशातील प्रत्येक बालकांमध्ये लहानपणापासून वैज्ञानिक दृष्टिकोन रुजविणे गरजेचे आहे. त्यातूनच बालवैज्ञानिक तयार होतील व पुढे देशाच्या विकासात हातभार लावतील. कारण डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांनी म्हटले आहे की, 'प्रत्येक घरातील मुलगा हा अगोदर शास्त्रज्ञ असतो. त्यामुळे त्यांना विज्ञानाच्या कुतूहलापासून दूर करू नका.' या विचारातूनच  प्रत्येक पालकात व समाजात वैज्ञानिक दृष्टिकोन रुजून समाजातील अंधश्रद्धा, चमत्कार, बुवाबाजी यांना विराम लागेल. समाजाचा पाया विज्ञान व तंत्रज्ञान याआधारे घातला जाईल. विज्ञानाला तंत्रज्ञानाची जोड मिळून समाजाची प्रगती साधली जाईल आणि जगातील विकसित तंत्रज्ञानात भारत देश सदैव अग्रेसर राहील.


निलेशकुमार रामभाऊजी इंगोले 
मोर्शी, जि. अमरावती
९३७११४५१९५

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार