सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

तिसरी लाट रोखण्यासाठी ‘माझा डॉक्टर’ बनून मैदानात उतरा

मुंबई : करोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यासाठी प्रशासनास कामाला लावल्यानंतर आता मुख्यमंत्रीही मैदानात उतरले

Sudarshan MH
  • May 10 2021 5:41PM


मुंबई : करोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यासाठी प्रशासनास कामाला लावल्यानंतर आता  मुख्यमंत्रीही मैदानात उतरले असून राज्यभरातील डॉक्टरांशी थेट संवाद साधत करोनाची लाट रोखण्यासाठी ‘माझा डॉक्टर’ बनून मैदानात उतरण्याचे आवाहन करीत आहेत. त्यांच्या या अभिनव उपक्रमास वैद्यकीय क्षेत्राकडूनही उत्स्फू र्त प्रतिसाद मिळत आहे. रविवारी अशाच प्रकारे आयोजित एका कार्यक्रमात मुंबईतील ७०० डॉक्टर्सनी करोना रोखण्यासाठी मैदानात उतरण्याची ग्वाही दिली.

राज्यभरातील खासगी डॉक्टरांशी दूरचित्रसंवादाच्या माध्यमातून संवाद साधण्याची संकल्पना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मांडली आहे. त्यानुसार राज्याच्या करोना नियंत्रणासाठीच्या राज्य कृती गटातील तज्ज्ञ डॉक्टर्सनी मुंबईतील सुमारे ७०० खासगी डॉक्टर्सना करोनाबाबतीत वैद्यकीय उपचारांबाबत निश्चित काय पद्धती अवलंबवावी याविषयी एकाच वेळी मार्गदर्शन केले आणि त्यांच्या अनेक शंकांचे निरसन केले. विशेष म्हणजे तीन-चार  दिवसांपूर्वी अशाच पद्धतीने मुंबईतील सुमारे ३०० डॉक्टर्सशी संवाद साधण्यात आला होता. अशाच रीतीने राज्यातील इतर विभागातील डॉक्टर्सशीदेखील संवाद साधण्यात येणार आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार