सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

जागतिक महिला दिन

८ मार्च हा दिवस संपूर्ण जगात "जागतिक महिला दिन" म्हणून साजरा केला जातो. जागतिक महिला दिन हा दिवस महिलांना सन्मान देण्यासाठी, स्त्री-सक्षमीकरण आणि स्त्री-पुरुष भेदभाव दूर करून स्त्री हक्काची जाणीव व स्त्री-पुरुष समानतेची मूल्ये रुजविण्याच्या दृष्टीने स्त्रीयांच्या गौरवार्थ साजरा केला जातो.

निलेशकुमार इंगोले ९३७११४५१९५
  • Mar 7 2021 10:26PM

८ मार्च हा दिवस संपूर्ण जगात "जागतिक महिला दिन" म्हणून साजरा केला जातो. जागतिक महिला दिन हा दिवस महिलांना सन्मान देण्यासाठी, स्त्री-सक्षमीकरण आणि स्त्री-पुरुष भेदभाव दूर करून स्त्री हक्काची जाणीव व स्त्री-पुरुष समानतेची मूल्ये रुजविण्याच्या दृष्टीने स्त्रीयांच्या गौरवार्थ साजरा केला जातो. खऱ्या अर्थाने महिलांची स्थिती सुधारल्याशिवाय महिला दिनाचे औचित्य सिद्ध होणार नाही. महिला धोरण आहे, परंतु ते गंभीरपणे राबवणे गरजेचे आहे.

त्यांचे हक्क त्यांना मिळतात की नाही हे पाहावे लागेल आणि त्यादृष्टीने पावले उचलावी लागतील. जेव्हा महिला आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी असतील आणि आपल्या कर्तुत्वाने स्वतःच्या पायावर उभा होतील तेव्हाच महिलांचे वास्तविक सशक्तीकरण होईल. त्यातूनच खरे स्त्री स्वातंत्र्य लाभून काहीतरी करण्याचा आत्मविश्वास त्यांच्यात निर्माण होईल.

अनेक समाज सुधारकांनी समाजातील स्त्रियांची स्थिती सुधारण्यासाठी व स्त्रियांना त्यांचा मानवी हक्क मिळावा म्हणून आयुष्यभर कार्य केले. समाजाला स्त्री-पुरुष समानतेचा संदेश दिला. परंतु आज आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने जर आपण सध्या स्थितीत मोकळ्या मनाने परीक्षण केले, तर असे दिसून येते की स्त्रियांची एवढी प्रगती होत असतांनाही त्यांना दोन भागात विभागलेले दिसून येते. स्त्रियांचा एवढा सन्मान होत असतांनाही एकीकडे संपूर्णपणे दडपल्या गेलेल्या, अशिक्षित आणि मागासलेल्या स्त्रिया आहेत. तर दुसरीकडे स्वतःला सिद्ध करणाऱ्या व बऱ्याच बाबतीत पुरुषांपेक्षाही नवीन उंचीला स्पर्श करून महिला नाव कमवीत आहेत.

स्वतःला सिद्ध करणाऱ्या महिलांचे यश निश्चितच प्रेरणादायी व अभिमानास्पद आहे. परंतु दुर्लक्षित, अशिक्षित आणि मागासलेल्या स्त्रियांसाठी सुद्धा प्रगतीची दारे खुली झाली पाहिजे. कारण नारीशक्ती ही समाजाचा आधार आहे.

महिलांचा विकास समाजाच्या प्रगतीचे द्योतक आहे. राष्ट्रहिताच्या दृष्टीने एका मजबूत समाजाची निर्मिती होण्यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक समाजातील महिलांचे स्त्री-सक्षमीकरण होऊन त्यांचे प्रत्येक क्षेत्रातील योगदान वाढविले पाहिजे. हे करण्यासाठी वरवर नव्हे, तर समाजाच्या हृदयात स्त्री आणि पुरुष यांच्यात समानता प्रस्थापित होणे गरजेचे आहे. हे करतांना समाजातील सामाजिक बंधनांमुळे अडकलेल्या स्त्रियांना मुक्त करण्यासाठी सुशिक्षित आणि संपन्न महिलांनी पुढाकार घेऊन या भगिनींना विकासाच्या व प्रगतीच्या प्रवाहात आणून त्यांना स्त्री हक्क मिळण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. त्याचबरोबर या संदर्भात पुरुष वर्गाने ही आपले कर्तव्य व स्त्री हक्काविषयी जागृत झाले पाहिजे.

महिलांना स्वातंत्र्य, समान हक्क, समान संधी आणि आदर हे पूर्ण अधिकार मिळालेच पाहिजे. यासाठी समाजाने जागृत झाले पाहिजे. महत्त्वाचे म्हणजे महिला दिन हा केवळ उत्सव नसावा, तर यातून स्त्रियांच्या हक्कांची समज विकसित झाली पाहिजे. त्यांच्यात सामर्थ्य निर्माण व्हावे यासाठी प्रयत्न झाले पाहिजे आणि त्यांच्या हक्काची जनजागृती केली पाहिजे. तरच स्त्री अत्याचारांपासून मुक्त होऊन आपल्या हक्काविषयी लढा देऊ शकेल. समाजातील महिलांवर होणाऱ्या छळातून त्यांना मुक्तता मिळू शकली तरच महिला दिनाचे महत्त्व सिद्ध होईल. 

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार