सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

अवैध गौण खनिज वाहतुक करणाऱ्या 105 वाहनांचे परवाने निलंबीत :

जिल्हा महसुल प्रशासनाची कारवाई

Snehal Joshi. MH
  • Jan 22 2021 10:06PM

                 
*परवाने निलंबीत केलेली वाहन 90 दिवस राहणार पोलिसांच्या ताब्यात*

गोंदिया:- गोंदिया जिल्ह्यात अवैध गौण खनिज चोरीवर आळा घालण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून गौण खनिज चोरी करणाऱ्यांवर दंड ठोठाविण्यात येत आहे. परंतु अवैध गौण खनिज वाहतुक करणाऱ्या 105 वाहनांवर पहिल्यांदाच जिल्हा महसुल प्रशासनामार्फत कारवाई करून वाहनाचे नोंदणी परवाने निलंबित करण्यात आले आहे. अवैध गौण खनिज वाहतुक प्रकरणी वापरल्या गेलेल्या वाहनांचे नोंदणी परवाने निलंबीत करण्याची कार्यवाही उप प्रादेशीक परिवहन अधिकारी यांच्या मार्फत आज दि. 22 जानेवारी 2021 रोजी करण्यात आली आहे. 

अवैध गौण खनिज वाहतुक प्रकरणात महसुल अधिकारी/ कर्मचारी हे रात्र-दिवस गस्त लावतात. या वेळेस त्यांच्यावर प्रसंगी हल्ले देखील झाले असून जिल्हाधिकारी गोंदिया यांनी गौण खनिज उत्खनन प्रकरणात बैठक घेऊन पोलिस अधिक्षक, गोंदिया यांना  कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहे.

गौण खनिज अवैध उत्खनन व अवैध वाहतुक प्रकरणात एकुण 105 वाहनांवर मोटार वाहन कायदा 1988 व 1989 अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. सदर वाहनांचे नोंदणी परवाने निलंबन झाल्यानंतर आता ही वाहने रस्त्यावर धावू शकणार नाही, म्हणुन या वाहनांना पुढील 90 दिवस पोलिसांच्या ताब्यात देण्याची कार्यवाही जिल्हाधिकारी गोंदिया यांच्या निर्देशान्वये करण्यात आली आहे. 

गौण खनिज चोरी प्रकरणात वापरण्यात आलेल्या वाहनांचे नोंदणी परवाने निलंबीत करण्यात आलेले आहे. या विषयी कारवाई करण्यात आलेल्या 105 वाहनांमध्ये गोंदिया ग्रामीण ठाणे 15 वाहन, रावनवाडी 39 वाहन, अर्जुनी मोरगाव 20 वाहन, देवरी 5 वाहन, गोरेगाव 6 वाहन, दवनीवाडा 18 वाहन, गंगाझरी 1 आणि रामनगर गोंदिया येथील 1 वाहनाचा समावेश आहे.

तसेच नोंदणी/ परवाना निलंबन केलेल्या 92 ट्रक्टर,  ट्राली 74, ट्रक/टिप्पर 4, नंबर प्लेट नसलेली ट्रक्टर 44, नंबर प्लेट नसलेली ट्राली 26, इतर राज्यातील ट्रक्टर 2, इतर राज्यातील ट्राली 1 आणि इतर राज्यातील 1 टिप्परचा समावेश आहे. पुढील भविष्यात अवैध खनिज उत्तखनन प्रकरणात आढळल्यास कठोर कार्यवाही करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी यांनी दिलेले आहेत.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

0 Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार