सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

उद्यापासून नागरिकांना नियमित पाणी:महापौर

शहरातील ७० टक्के वस्त्यांना याचा फटका बसला होता.मात्र ३० दिवसांचे काम १३ दिवसातच पूर्ण झाल्याने उद्या दि. २१ जानेवारीपासून शहरात आता पूर्ववत व नियमित पाणी पुरवठा करण्यात येणार असल्याची माहिती आज महापौर दयाशंकर तिवारी यांनी पत्र परिषदेदरम्यान दिली.

Snehal Joshi . सौजन्य- सत्ताधीश
  • Jan 20 2021 10:16PM
गेल्या ६ जानेवारीपासून ते ६ फेब्रुवारी पर्यंत तब्बल महिनाभर एक दिवसा आड पाणी पुरवठ्याचा निर्णय महानगरपालिकेच्या जलप्रदाय समितीचे सभापती पिंटू झलके यांनी जाहीर केला होता.शहरातील ७० टक्के वस्त्यांना याचा फटका बसला होता.मात्र ३० दिवसांचे काम १३ दिवसातच पूर्ण झाल्याने उद्या दि. २१ जानेवारीपासून शहरात आता पूर्ववत व नियमित पाणी पुरवठा करण्यात येणार असल्याची माहिती आज महापौर दयाशंकर तिवारी यांनी पत्र परिषदेदरम्यान दिली. नवेगाव खैरी येथून २७ किलोमीटर लांबीच्या २३ मी.मी.व्यासाच्या जलवाहीनीतून गोरेवाडा येथे पाणी आणल्या जातं. या ठिकाणी पाणी शुद्ध करुन शहराला पुरवठा केला जातो.या वाहिनीवर दूरगाव व करंभाड गावाच्या दरम्यान ४ ठिकाणी गळती आढळली होती.या गळतीमुळे दररोज ४ ते ५ एमएलडी पाण्याचा अपव्यय होत होता. परिणामी येत्या उन्हाळ्यात शहराला तीव्र पाणी टंचाईचा समाना करावा लागला असता.पाईप लाईनच्या दुरुस्तीसाठी ३० दिवसांचा कालावधी लागणार होता मात्र कंत्राटदाराने दिवसरात्र एक करुन अवघ्या १३ दिवसात पाईप लाईन्सची दुरुस्ती केल्याचे पिंटू झलके यांनी सांगितले. पेंच ते गोरेवाडा या दरम्यानच्या मोठ्या जलवाहिनीला लागलेली गळती दुरुस्त करण्यासाठी ६ जानेवारी पासून एक दिवसा आड पाणी पुरवठा केल्या जात होता.पाणी पुरवठ्यासाठी जलसंपदा विभागाच्या कलाव्यांद्वारे महादूलापर्यंत पाणी आणले जात होते. हे अंतर ४८ कि.मी. होते.येथून पाण्याचा उपसा करुन गोरेवाडा जलशुद्धीकरण केंद्रात आणले जात होते. कालव्यातून २०० क्यूसेस पाणी सोडण्यात येत होतं. त्यापैकी १५० क्यूसेस पाणी नागपूर शहरात पोहोचत होतं.कालवाच्या पाणी वापरसाठी जलसंपदा विभागाने परवानगी दिली होती. एक दिवसाआड पाणी पुरवठ्याचा फटका प्रामुख्याने पश्‍चिम, दक्ष्णि-पश्‍चिम, दक्ष्णि आणि मध्य नागपूर विधानसभा मतदारसंघाला बसला होता.गोरवाडा येथून लक्ष्मीनगर झोन,धरमपेठ,हनुमान नगर,धंतोली,गांधीबाग तसेच सतरंजीपुरा,आशीनगर व मगंळवारी झोनच्या काही भागांना पाणी पुरवठा केला जात होता.या झोन अंतर्गत जवळपास शहरातील ६५ टक्के वस्त्या येताता. कन्हान नदीवरुन पाणी पुरवठा होणा-या वस्त्यांना मात्र नियमित पाणी मिळत होतं. १२ दिवसांच्या विक्रमी वेळेत ५ जागांवार ७ फ्लोमीटर बसविण्यात अाल्याचे पिंटू झलके यांनी सांगितले.एका फ्लो मीटरला तब्बल दीड महिन्यांचा कालावधी लागणार असल्याने ते बसविणे तात्पुरते रद्द केल्याचे त्यांनी संागितले.या दुरुस्तीमुळे ५४ एमएलडी पाण्याची गळती थांबवण्यात यश मिळाल्याचे ते म्हणाले.युद्धस्तरावर काम केल्यामुळेच नागपूरकरांना १३ दिवसात दिलासा मिळाला असल्याचे ते म्हणाले. कॅनोल दुरुस्ती हे काम शासनाच्या बांधकाम विभागाअंतर्गत येत असून या विभागाने राज्य शासानाकडे दुरुस्तीचा प्रस्ताव पाठवल्याची माहिती त्यांनी दिली. 

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

0 Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार