सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

Tandav वेब सीरिजवर आक्षेपानंतर मेकर्सचा निर्णय

तांडव वेब सीरिजला देशभरातील विरोध पाहता टीमनं एक पाऊल मागे घेतलं आहे.

Sudarshan MH
  • Jan 20 2021 11:46AM

बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान स्टारर आणि अली अब्बाज जफर दिग्दर्शित वेब सीरीज 'तांडव'ला  देशभरात मोठ्या प्रमाणात विरोध होत आहे. या वेब सीरिजमध्ये हिंदू देवी-देवतांचां अपमान केल्याचा आणि जातिगत भावना भडकवल्याचा आरोप आहे. त्यामुळे ही वेब सीरिज बॅन करण्याची मागणी सोशल मीडियावर जोर धरू लागली. विरोध पाहता अखेर या वेब सीरिजमध्ये बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

दिग्दर्शक अली अब्बाज जफर यांनी ट्विट केलं आहे. तांडवमधील आक्षेपार्ह सीन बदलणार असल्याची पोस्ट त्यांनी केली आहे. तांडवच्या टीमकडून अधिकृतरित्या हे पत्रक जारी करण्यात आलं आहे. कुणाच्याही भावना दुखावण्याचा आमचा हेतू नव्हता. पण कुणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर आम्ही माफी मागतो, असं या पत्रकात म्हटलं आहे. तसंच आवश्यक ते बदल करण्याचा निर्णयही घेतल्याचं नमूद करण्यात आलं आहे.

 

 

 

मिळालेल्या माहितीनुसार, वेब सीरीज तांडवच्या पहिल्या एपिसोडमध्ये 17व्या मिनिटाला दाखवण्यात आलेल्या हिंदू देवी-देवतांना अमर्याद पद्धतीने दाखवून धार्मिक भावना भडकवल्याचा आरोप लावण्यात आला आहे. तसंच महिलांचा अपमान केल्याने वेब सीरीजचा हेतू एका समुदायाच्या धार्मिक भावना भडकवल्याचंही म्हटलं आहे. या सीरीजचा व्यापक प्रसार समाजासाठी हानिकारक असल्याचं म्हणत वेब सीरीजविरोधात एफआयआरही दाखल करण्यात आली आहे. यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.

 

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार