सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

मी केलेल्या कामाचे श्रेय नागपूरकरांचेच : ना. नितीन गडकरी

मी केलेल्या कामाचे श्रेय   नागपूरकरांचेच : ना. नितीन गडकरी पद्मगंधा प्रतिष्ठानचा जीवनगौरव पुरस्कार सोहोळा

Snehal Joshi .
  • Jan 17 2021 10:58PM
नागपूरकरांनी मला संधी दिल्यामुळेच मी नागपुरात आणि भारतभरात मोठमोठी कामे करू शकलो. नागपुरातही आज डबल डेकर पूल बांधला, फुटाळ्यावर जागतिक दर्जाचे कारंजे होणार आहेत, ब्रॉडगेज मेट्रोही लवकरच लोकांच्या सेवेसाठी येणार आहे. ही सर्व कामे लोकांमुळेच होऊ शकली, त्यामुळे या कामाचे श्रेय नागपूरकरांचे आहे. लोकांनी मला सेवेची संधी दिली त्यामुळेच ही कामे शक्य झाली, असे भावपूर्ण उद्गार केंद्रीय रस्ते वाहतूक, महामार्ग, परिवहन व एमएसएमई मंत्री नितीन गडकरी यांनी काढले.
पद्मगंधा प्रतिष्ठानतर्फे ना. नितीन गडकरी यांना आज नलिनी बाळकृष्ण देवपुजारी स्मृती जीवन गौरव पुरस्कार देण्यात आला. शक्तिपीठ रामनगर येथे झालेल्या या कार्यक्रमाला तामिळनाडूचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित, माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस, संस्कार भारतीच्या अध्यक्षा सौ. कांचनताई गडकरी, पद्मगंधा प्रतिष्ठानच्या शुभांगी भडभडे, कालिदास संस्कृत विद्यापीठाचे माजी कुलगुरु, डॉ. पंकज चांदे, डॉ. सतीश देवपुजारी आदी उपस्थित होते. अनेक वेगवेगळ्या प्रकारची कामे करण्याची संधी मला प्राप्त झाल्याचे सांगताना ना. गडकरी यांनी सांगितले की, कारगिलच्या भागात मी जोजिला बोगदा बांधत आहे. आशिया खंडातील सर्वात मोठा हा बोगदा आहे. ब्रह्मपुत्रेवर आणि गंगा नदीवर प्रत्येकी 6 पूल मी बांधले. 1300 किमीचा मुंबई दिल्ली हा ग्रीन एक्सप्रेस येत्या वर्षभरात पूर्ण होईल. गंगा शुध्दीकरण, जलमार्ग वाहतूक सुरु करणे अशी अनेक कामे माझ्या हातून झाली. तंत्रज्ञानाचा वापर करून कोरोनाच्या काळात मी 280 व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून 80 कोटी लोकांशी संपर्क केला.
सामाजिक क्षेत्रातही अनेक गरीब लहान मुलांच्या हृदयाच्या शस्त्रक्रिया, अपंगांना कृत्रिम पाय लावून देण्यास मदत केली. अशा सेवांमध्येच मला आनंद असल्याचे सांगताना ना. गडकरी म्हणाले- रा. स्व. संघ, अभाविप आणि माझी आई यांनी दिलेल्या संस्कारातून मी घडलो. त्यांनी दिलेल्या संस्काराचा वारसा मला लाभला. विदर्भातील शेतकर्‍यांच्या आत्महत्या रोखण्याचा मी भरपूर प्रयत्न केला, पण त्या कामात अजून पाहिजे तेवढे यश मिळाले नाही, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. गावागावात आज परिस्थिती खूप खराब आहे. म्हणून गावांचा विकास करण्याचे मी ठरविले आहे. मागास क्षेत्र आणि शेतकरी यांचा आर्थिक व सामाजिक विकास झाला पाहिजे, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.
अनेक अशक्य कल्पना शक्य व्हाव्यात यासाठी माझे काम सुरु असतात, असे सांगताना ना. गडकरी म्हणाले- शेतकर्‍याने निर्माण केलेल्या इंधनावर वाहने चालावी व हे शहर आणि देश प्रदूषणमुक्त व्हावे असे माझे प्रयत्न आहेत. देशासाठी, मातृभूमीसाठी काम करायचे. निधीची कमतरता नाही. फक्त इच्छाशक्ती हवी. देशाला सर्वच क्षेत्रात आम्ही खूप पुढे नेऊ शकतो. रा. स्व. संघ, विद्यार्थी परिषद, रा. से. समिती यांच्या शिकवणीतून संस्कार मिळतात व व्यक्तित्व निर्माण होते, या संस्कारांमुळेच मातृभूमीची आणि देशाची सेवा मी करू शकलो, असेही ते म्हणाले. तामिळनाडूचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित व विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनीही याप्रसंगी आपले विचार व्यक्त केले. कार्यक्रमाचे संचालक प्रभा देऊस्कर यांनी केले.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार