सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

ज्या प्रियकरासोबत आयुष्यभराची स्वप्न पाहिली होती त्यानेच हिरावून घेतले प्रेयसीचे आयुष्य;

प्रियकरासोबत आयुष्यभराची स्वप्न पाहिली होती त्यानेच हिरावून घेतले प्रेयसीचे आयुष्य;

Sudarshan MH
  • Jan 17 2021 11:06AM
पालघर : पालघर जिल्ह्यातील वानगाव येथे प्रियकराने प्रेयसीला मारून भितीत गाडून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. प्रियकराने आपल्या प्रेयसीची हत्या करून तिला भिंतीत पुरल्याची घटना समोर आली आहे.  मिळालेल्या माहितीनुसार, उमरोली भागात राहणारी अमिता मोहिते (वय 32) यांचे बोईसर येथील सूरज घरत (वय 28) यांच्यात प्रेमसंबंध होते. २१ ऑक्टोबरला अमिता आपले घर सोडून निघाली होती आणि सूरजसमवेत वणगाव परिसरातील वृंदावन इमारतीत भाड्याने असलेल्या फ्लॅटमध्ये राहायला आली होती. पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, त्याच दिवशी अमिताने सूरजवर लग्नावर दबाव आणला असता दोघांमध्ये भांडण झाले. त्यानंतर सूरजने अमिताची हत्या केली आणि मृतदेह बाथरुमच्या वर पुरला. आणि याचा कोणताही संकेत मिळू नये म्हणून तो वृंदावन बिल्डिंगच्या त्याच फ्लॅटमध्ये राहत होता.

उमरोली येथील हे प्रेमी युगुल पळून लग्न करण्यासाठी पळून जाऊन वानगाव येथील वृंदावन दर्शनमध्ये राहायला गेले. त्याच रात्री आरोपी प्रियकराने अमिता मोहिते या प्रियसीचा गळा दाबून खून केला आणि तिचा मृतदेह भिंतीमध्ये बांधकाम करून पुरून टाकला. चार महिन्यापासून प्रियकर हा त्याच ठिकाणी राहत होता. सदर घटनेचा  संशय मृत मुलीच्या नातेवाईकांना आल्यानंतर त्यांनी पोलिसात तक्रार दिली. त्यानंतर पोलीसांनी  सदर घटनेचा तपास केला असता हा प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी आरोपी प्रियकराला अटक केली असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.

या घटनेबाबत धक्कादायक खुलासे झाले आहेत. लव्ह मॅरेजसाठी मृत व्यक्तीने तिच्या प्रियकरासह पळ काढला होता. हत्येच्या आरोपावरून पोलिसांनी मुलीच्या प्रियकराला अटक केली आहे. उमरोलीची अमिता मोहिते चार महिन्यांपूर्वी प्रियकराच्या प्रेमासाठी घर सोडून गेली होती पण परत आली नाही आणि यामुळे कुटुंबीयांनी तिचा शोध सुरू केला. या महिन्यांत मुलीचा प्रियकर तिच्या घरून फोन आल्यावर उचलत नव्हता. मात्र,  तिचा सोशल मीडिया वापरत होता आणि व्हॉट्सअ‍ॅपवरुन मुलीच्या कुटूंबाशी संपर्क साधत होता आणि आपली मुलगी असल्याचे भासवत होता. मात्र, मुलीच्या कुटुंबियांना संशय आला आणि त्यांनी बोईसर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. तपासादरम्यान प्रियकराने पोलिसांना सांगितले की त्याने मुलीची हत्या केली आणि तिचा मृतदेह भिंतीत पुरला आणि तो चार महिन्यांपासून त्याच भाड्याच्या फ्लॅटमध्ये राहतो.
धक्कादायक बाब म्हणजे या तरूणाने सपाट भिंतीमध्ये महिलेचा मृतदेह बंद करुन स्वत: ही भिंत उभी केली. पोलिस सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

0 Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार